-->
सुपा-मोरगाव रस्त्यावर सुमारे 62 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

सुपा-मोरगाव रस्त्यावर सुमारे 62 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

मोरगांव : राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक २  यांनी बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी गावच्या हद्दीत सुपा- मोरगाव रस्त्यावर असलेल्या रंगीला राजस्थान ढाबा येथे अतिशुद्ध मद्यार्क  ( स्पिरिट ) साठा  मुद्देमाल जप्त केला आहे. टॅंकर सुमारे 62 लाखाहून अधिक किमतीचा हा मुद्देमाल आहे.



 याबाबत सविस्तर वृत्त असे की निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक २  पुणे यांना खात्रीलायक गोपनीय बातमी मिळाल्यानंतर सुपे  - मोरगाव रोड वरील भोंडवेवाडी ता. बारामती ,  जि. पुणे येथिल रंगीला राजस्थान ढाबा येथे ढाब्याच्या  आवारात टॅंकर लावून वाहन चालक       सुखनाम दिलज्योत  सिंग वय वर्ष 56 रा. कोटदाणा ता.जि . तरणतारण  या इसमाने सदर ढाब्यावर   वाहन लावून प्लास्टिक पाइपच्या साह्याने टँकरमधून अतिशुद्ध मद्यार्क  चोरी करून आरोपी क्रमांक १ पुखराज टीकमजी भार्गव  ( ढाबा  चालक ) वय वर्षे 42  रा . कुतवळवस्ती रंगीला राजस्थान ढाबा  ,सुपा मोरगाव रोड , ता. बारामती, जि. पुणे  मूळ पत्ता मु. पो. कोठडी  , तालुका दिसोरी , जिल्हा पाली ,राजस्थान  यांना विक्री करणार असल्याचे समजते होते .



 सदर ठिकाणी छापा घातला असता स्पिरिटची अवैधरित्या चोरी करताना रंगेहात पकडण्यात आले. सदर दोन्ही आरोपींविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65  ( क , ड  ) 81, 83 व 108 अन्वये गुन्हा दाखल केला आहे .सदर गुन्ह्यातील आरोपी कडून अशोक लेलँड कंपनीचा सोळा चाकी टॅंकर वाहन क्रमांक एम.पी . 09 ए . जे . 0277  या वाहनासह अंदाजे चाळीस हजार लिटर अतिशुद्ध मद्यार्क (स्पिरिट )  प्लास्टिक  पाईप असा एकूण 62 लाख 7 हजार 110 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . लॉकडाऊन काळात सर्वात मोठी कारवाई करण्यास पुणे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाला यश आले आहे .सदर कार्यवाही प्रसाद सुर्वे विभागीय भरारी उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग  , संतोष झगडे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे  , संजय  जाधव , संजय पाटील उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल बिराजदार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन पुणे  ,विजय मनाळे  निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क दौंड विभाग , विकास थोरात दुय्यम निरीक्षक सतीश इंगळे दुय्यम निरीक्षक , प्रशांत दहींजे ,  जवान सर्वश्री नवनाथ पडवळ , बि. आर .सावंत , विजय विंचुरकर , अशोक पाटील  , महिला जवान मनिषा भोसले , जवान केशव वामणे , अभिजीत सिसोलेकर  यांनी कार्यवाही केली . पुढील तपास विकास थोरात दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन पुणे हे करीत आहे.



 


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article