बारामती ; आज 7 पॉझिटिव्ह, पणदरे (जगताप वस्ती) 56 वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण
बारामती- बारामतीत आज तब्बल सातजणांना कोरोनाची लागण झाली आहे. सकाळी आलेल्या अहवालात चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता तिघांना कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये रुईतील कोव्हिड केअर सेंटरमधील एका सफाई कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. त्यामुळे आज दिवसभरातील रुग्णांची संख्या सातवर पोहोचली असून एकूण रुग्णसंख्या १२२ झाली आहे.
बारामतीत काल ४५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये ३८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून सकाळच्या अहवालांमध्ये चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर तिघांचे अहवाल प्रतीक्षेत होते. यातील तिघांचेही अहवाल आता प्राप्त झाले असून या तिघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित एका कर्मचाऱ्याचा समावेश असून पणदरे येथील 56 वर्षीय पुरुषास आणि बारामती शहरातील एक अशा दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे.
बारामतीत आज दिवसभरात तब्बल सातजणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १२२ वर पोहोचली आहे. दरम्यान, आज सकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयातील एका पोलिस कर्मचाऱ्यासह वकिलांचा समावेश आहे. तर आताच्या अहवालामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.