करंजेपुल व मोढवे या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या २० नागरिकांकडून १० हजाराचा दंड वसूल
वडगाव निंबाळकर पोलिसांनी आणि ग्रामपंचायत करंजेपुल आणि मोढवे या ठिकाणी वडगाव निंबाळकर पोलीस आणि ग्रामपंचायतीने संयुक्त रित्या ही कारवाई करत मास्क न वापरणाच्या २० जणांवर कारवाई करत १० हजारांचा दंड वसूल केला.
करंजेपुल येथील निरा बारामती रस्ता आणि मोढवे या पारिसरात मास्क न वापरणाऱ्या २० जणांवर कारवाई करत १० हजार रुपये दंड वसूल केला. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनने यापूर्वी अनेकवेळा अशा प्रकारची कारवाई करत ३८ जणांकडून १९ हजार रुपये दंड वसूल केला आहे. कोरोणा महामारीचे अनुषंगाने मास्क न वापरणारे लोकांवर कारवाई करण्यात आली असुन यापुढे मास्क न वापरता मिळुन येणारे लोकांनवर दंडात्मक कारवाईक करण्यात येणार आहे. प्रत्यकी इसमास ५००/- रू या प्रमाणे दंड आकरण्यात आला आहे.
कारवाई दरम्यान करंजेपुल पोलीस दुरक्षेत्रचे पोलीस पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे, पोलीस नाईक काशीनाथ नगराळे, नितीन बोराडे यांनी ही कारवाई केली.