श्री सिद्धेश्वर ज्युनिअर कॉलेज शाळेच्या दहावीचा निकाल १०० टक्के
कोऱ्हाळे बु || - दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. यामध्ये बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथील श्री सिद्धेश्वर पब्लिक व ज्युनिअर कॉलेज शाळेच्या दहावीचा निकाल 100% लागला आहे.
दहावीचा निकाल 100 % लागल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष/प्राचार्य राहुल भगत सर यांनी दिली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य श्री.राहुल भगत सर, चेअरमन श्री. दत्तात्रय माळशिकारे सर , सचिव प्रा. श्री. महेश तांबे सर, कॉलेजचे प्राचार्य जालिंदर भोसले सर, व्यवस्थापक श्री साळुंखे सर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
निकाल पुढीलप्रमाणे :-
१) अनुष्का दत्तात्रय माळशिकारे ९३.४०
२) अजिंक्य सतीश खराडे ८६.४०
३) प्रिती संजय पडवळ ८५.६०
४) पूनम बापूराव भगत ८४.४०
५) दिव्या अनिल भगत ८१.२०