मुरूम येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण
Friday, July 3, 2020
Edit
बारामती तालुक्यातील मुरूम या गावातील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . सोमेश्वरनगर परिसरात पहिलाच कोरोना पेशेंट सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सदरील व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने तो स्वतः होऊन काल दि २ रोजी पुणे येथे हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता . आज सकाळी त्याची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . गेल्या चार महिन्यापासून सोमेश्वरनगर पारिसरातील नागरिकांनी काळजी घेतल्यामुळे या भागात एक ही कोरोना पेशेंट नव्हता मात्र हा पाहिलाच कोरोना पेशेंट सापडल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.