मुरूम व वाणेवाडी गाव पुढील १४ दिवसांसाठी लॉकडाऊन
Friday, July 3, 2020
Edit
बारामती - बारामती तालुक्यातील मुरूम या ठिकाणी आज कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर वाणेवाडी आणि मुरूम ग्रामपंचायतीने १४ दिवसांचा लोकडाऊन जाहीर केला आहे. याबाबत वाणेवाडीचे उपसरपंच संजय जगताप आणि मुरूम चे उपसरपंच निलेश शिंदे यांनी याबाबत माहिती दिली.
आज सकाळी मुरूम या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह सापडला, सोमेश्वरनगर परिसरात पहिलाच कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली, आज वाणेवाडी चा भरलेला आठवडे बाजार कोरोना पेशेंट सापडल्यामुळे दुपारीच बंद केला तर मुरूम आणि वाणेवाडी या गावातील दवाखाने, मेडिकल आणि किराणामाल ही दुकाने वगळता इतर दुकाने पुढील १४ दिवस बंदच राहतील.