लोणी भापकर येथील एक व्यक्ती, काल सापडलेल्या आयटी अभियंत्याचा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह
Thursday, July 2, 2020
Edit
बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील एका पोलीसाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली . सदरील व्यक्ती ही लोणावळा या ठिकाणी पोलीस असून त्याचा सहकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने दि २६ रोजी हा व्यक्ती लोणी भापकर या ठिकाणी आला होता , त्याला सर्दीचा तास होऊ लागल्याने काल दि १ रोजी त्याची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
कालच्या कोरोनाग्रस्त आयटी अभियंत्याच्या संपर्कातील सहा जणांची तपासणी करण्यात आली होती . त्यामध्ये त्याच्या भावासही कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे . आज आढळलेल्या नव्या रुग्णांवरही रुई येथील केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.