राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषदेच्या बारामती तालुकाअध्यक्षपदी ह.भ.प विशाल महाराज मासाळ यांची निव
बारामती - राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषदेच्या बारामती तालुकाअध्यक्षपदी मासाळवाडी येथील ह.भ.प विशाल महाराज मासाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प माधवानंद महाराज आळंदीकर आणि कार्याध्यक्ष योगेश महाराज शिंदे, सुनील महाराज यादव (पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष) व राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवचरित्रकार अॅड ह.भ.प राहुल महाराज पारठे यांच्या संमतीने या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
विशाल महाराज हे मुळचे मासाळवाडी येथील रहिवासी असून ते कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करतात. महाराजांच्या कुटुंबात आधीपासूनच वारकरी संप्रदायाचा वारसा असल्या कारणाने अगदी लहान लहानपणापासून महाराजांना वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला. त्यामुळे त्यांच्यावर ही जिम्मेदारी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे मित्र परीवाराकडुन सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.