बारामती पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फत रोगप्रतिकारक, शक्तीवर्धक गोळ्यांचे वाटप
बारामती - पंचायत समिती बारामती, आरोग्य विभागामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत जेष्ठ नागरिक व कोमर्बीड व्यक्तींना रोगप्रतिकारक शक्तीवर्धक गोळ्यांचे वाटप करण्यात आहे.
60 वर्षावरील जेष्ठ नागरिक व रक्तदाब, मधुमेह असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. या व्यक्तींची रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक असल्याने या व्यक्तींना व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी 3, झिंक गोळी व अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे तालुकास्तरीय वितरण प्राथनिधिक स्वरूपात करण्यात आले.
यावेळी आरोग्य व बांधकाम समिती जिल्हा परिषद सभापती प्रमोद काकडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, सभापती पंचायत समिती बारामती सौ. निता बारवकर, जि.प.सदस्य भरत खैरे, जि.प.सदस्य सौ. मिनाक्षी तावरे, प्रदीप धापटे, पंचायत समिती बारामती उपसभापती, शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य रोहित कोकरे, पंचायत समिती सदस्य राहूल भापकर, गटविकास अधिकारी राहूल काळभोर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे तसेच इतर विभागातील विभागप्रमुख उपस्थित होते.