मुढाळे ; धान्याचा काळा बाजार करणाऱ्या रेशनिंग दुकानदारावर गुन्हा दाखल
कोऱ्हाळे बु|| - बारामती तालुक्यातील मुढाळे येथे रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार करून खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी गहू साठवून ठेवल्या प्रकरणी बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांच्या आदेशानुसार रेशनिंग चालकावर कारवाई करून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
आरोपी गोकुळ रामचंद्र पवार ( रा. भिलारवाडी ता. बारामती ) असे कारवाई करण्यात आलेल्या रेशनिंग चालकाचे नाव आहे, याबाबत तलाठी सुरेश जगताप यांनी फिर्याद दिली आहे, सोमवार ( दि. ६) रोजी इसम शिवाजी रामचंद्र बोबडे ( रा. मूढाळे ता. बारामती ), यांच्या मालकीच्या मंगल कार्यालयातील उघड्या पत्र्याच्याशेड मध्ये ३१ गव्हाणे भरलेल्या पिशव्या ठेवण्यात आल्या आहेत अशी खात्रीशीर माहिती तलाठी सुरेश जगताप यांना मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.