तालुक्यात 1 जून पासून सायंबाचीवाडी परिसरात सर्वाधिक पाऊस
मोरगांव : बारामती तालुक्यातील २७ प्रजन्यमापक केंद्रात पडलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार एक जुनपासुन सायंबाचीवाडी परीसरात सर्वाधीक ६२० मिमि पाऊस तर काटेवाडी परीसरात सर्वात कमी म्हणजे १६७ . ८ मिमि पाऊस पडला आहे .
तालुक्यातील मोरगांव , सुपा , लोणी भापकर ,माळेगाव, वडगांव निंबाळकर ,सोमेश्वर कारखाना , जळगाव क. प . ,सायंबाचीवाडी ,पणदरे , उंडवडी क.प . आदी २७ गावांमध्ये प्रजन्यमापक केंद्र बसविले आहे . यानुसार प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार तालुक्याच्या जिरायती भागात यंदा सरासरी किमान २०० ते कमाल ६०० मिमि पाऊस पडला आहे .
तालुक्यात १ जुन पासून आज अखेर चौधरवाडी , काटेवाडी, माळेगाव कारखाना, सुपा ,उंडवडी क. प . येथे ३०० मिमि पेक्षा कमी पाऊस पडला असला तरी उर्वरित सर्व तालुक्यात चांगला पाऊस पडला आहे .तालुक्यातील आज अखेर पर्यंत पडलेल्या पावसामुळे खरीपाची पिक चांगली उगवली असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे .