नाझरे धरण 100 टक्यांच्या उंबरठ्यावर, रात्री 11 च्या दरम्यान कऱ्हा नदीत 2000 क्यूसेक्स ने विसर्ग चालू होणार
जेजुरी - पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण 100 टक्यांच्या उंबरठ्यावर असून रात्री 11 च्या दरम्यान धरणावरील २६ स्वयंमचलीत दरवाजे उघडण्याची शक्यता आहे . यामुळे नाझरे धरणातुन अंदाजे 2000 क्युसेस पाण्याचा विसर्ग स्वयंचलित दरवाजातून होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नाझरे धरण शाखाधीकारी एस . जी . चौरंग यांनी दिलेला आहे .पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणाची क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट ( पाऊण टीएमसी ) एवढी आहे. आज दि १५ ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता धरण 100 टक्के भरणार आहे . नारायणपूर, सासवड परिसरात मोठा पाऊस होत असल्याने धरण क्षेत्रात चौदा हजार क्यूसेस पाणी येत आहे .
नाझरे धरण शाखाधिकारी एस . जी . चौलंग यांनी परीपत्रकाद्वारे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी आपले पशुधन तसेच नदी पात्रालगतच्या विद्युत मोटरी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आवाहन केले आहे . तसेच नदीपात्रामध्ये रात्री कोणीही न जाण्याचे आवाहन त्यांनी केलेले आहे. परीपत्रकानंतर आज याबाबत तरडोली व परिसरातील ग्रामपंचायतीने दवंडीद्वारे गावच्या सतर्केचा ईशारा दिला आहे.