-->
नीरा खोऱ्यातील सर्व चारही धरणे 100 टक्के, वीर मधील विसर्ग बंद

नीरा खोऱ्यातील सर्व चारही धरणे 100 टक्के, वीर मधील विसर्ग बंद

कोऱ्हाळे बु- नदीच्या खोऱ्यातील सर्व चारही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे त्याचबरोबर निरा खोऱ्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आज सकाळी वीर धरणातून सोडण्यात येणारे पाणी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.



नीरा नदीच्या खोऱ्यात वीर, भाटघर, नीरा – देवघर आणि गुंजवणी ही चार धरणे येतात. यंदा ही चारही धरणे समारे तीन आठवडे उशिराने भरलेली आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून निरेच्या खोऱ्यात पावसाने हात आखडता घेतल्याचे दिसून आले. मात्र मागील दहा दिवसात नीरा खोऱ्यात संततधार पाऊस कोसळला आणि सर्व चारही धरणे 24 ऑगस्ट रोजी शंभर टक्के भरली आहेत. विर आणि गुंजवणी ही दोन्ही धरणे या पूर्वी शंभर टक्के भरली होती. परंतु पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी या धरणातून सातत्याने पाणी सोडण्यात आले. बुधवार ( आज 25 ऑगस्ट ) पासून वीर मधून सोडण्यात येणारे पाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे.


निरेच्या खोऱ्यात एकूण पाणीसाठा 48. 329 टी एम सी इतका झालेला आहे. त्यामध्ये भाटघर धरण 23. 502 टीएमसी नीरा देवघर धरण 11. 729 टीएमसी, वीर धरण 9. 408 टीएमसी आणि गुंजवणी धरण 3.690 टी एम सी असा एकूण 48 पॉईंट 329 पाणीसाठा खोऱ्यात झालेला आहे.


यापुढील काळात पावसाची परिस्थिती पाहून धरणातून पाणी सोडले जाईल असे नीरा उजवा कालवा विभागाकडून सांगण्यात येते.
उशिरा का असेना नीरा खोऱ्यातील सर्व धरणे 100 टक्के भरल्याने पुढच्या वर्षभरातील पाण्याचा प्रश्न सुटला आहे.


 


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article