आज बारामतीत आणखी 13 जण कोरोना बाधित, एकूण संख्या 189
काल नव्याने 96 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 83 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून तेरा नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे प्राप्त झालेल्या अहवालात पैकी शहरातील नऊ व ग्रामीण भागातील चार असे तेरा रुग्ण आज पॉझिटिव्ह आढळून आले आहेत
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये खाटीक गल्ली येथील 47 वर्षे पुरुष व शहरातील 17 वर्षीय युवक व रुई येथील 27 वर्षीय युवक यांचा समावेश आहे तसेच प्रगती नगर येथील 52 वर्षीय वडिलांसह 24 वर्षीय मुलाचाही समावेश आहे तांदूळवाडी येथील 70 वर्षीय महिला येथीलच 45 वर्षीय महिला व कृषी देवनागरीतील 36 वर्षे पुरुष यांना कोरोना ची लागण झालेली आहे समर्थनगर येथील 65 वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे ग्रामीण भागातील गुणवडी येथील 37 वर्षीय पुरुष माळेगाव बुद्रुक येथील 29 वर्षीय पुरुष बर्हाणपूर येथील सत्तावन्न वर्षे पुरुष व निंबोडी येथील पूर्वी पॉझिटिव आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील त्याच्या वडिलांना कोरोना ची लागण झालेली आहे