-->
बारामती, शहरात 14 व ग्रामीण भागातील 11 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 824

बारामती, शहरात 14 व ग्रामीण भागातील 11 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 824

काल बारामती मध्ये एकूण 113 जणांचे नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 76 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून अकरा जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहे व बारामती शहरातील 14 व ग्रामीण भागातील 11 असे एकूण 25 रुग्णांचा अहवाल  rt-pcr पॉझिटिव्ह आलेला आहे व दौंड मधील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे त्यामुळे बारामतीची रुग्ण संख्या 824 झालेली आहे तसेच रात्री  ग्रामीण रुग्णालय रूई येथे उपचार सुरू असताना चोपडज येथील वृद्धाचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे बारामतीतील मृत्यूंची संख्या 34 झाली आहे.आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील श्रीराम नगर येथील दोन, अमराई येथील 2,माऊली नगर जळोची येथील एक, जामदार रोड येथील एक, बुरुड गल्ली येथील एक, देवळे पार्क येथील एक,जुना मार्केट येथील एक, संभाजीनगर येथील एक, बारामती शहरातील 4 रुग्ण असे शहरातील 14 व निंबुत येथील तीन, गुणवडी येथील 2, पंधरे येथील एक, मूर्टी येथील एक, बर्‍हाणपूर येथील एक, सुपा येथील एक, काटेवाडी येथील एक,अंजणगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article