बारामती, आज 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 632
काल बारामती मध्ये एकूण 93 नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 89 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बारामती शहरातील 2 व ग्रामीण भागातील एक असे तीन व इंदापूर तालुक्यातील एक असे चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे तसेच बारामती मध्ये आज ग्रामीण रुग्णालय रूई येथे एंटीजेन तपासणीसाठी 45 नमुने घेण्यात आले होते त्यापैकी बारामती शहरातील चार व ग्रामीण भागातील एक असे पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे तसेच बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 42 जणांचे नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी शहरातील सहा व ग्रामीण भागातील चार असे दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे आज दिवसभरात बारामतीमध्ये तीन rt-pcr व पाच शासकीय एंटीजेन व 10 खाजगी एंटीजेन असे एकूण अठरा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला असून बारामतीची रुग्ण संख्या 632 झालेली आहे तसेच बरे झालेल्या रुग्णांची संख्या 369 झाले आहे