बारामती; आज 21 जण पॉझिटिव्ह, एकूण 257
101 संशयित नमुन्यांमध्ये नऊ अध्याप प्रतीक्षेत आहेत तर 77 जण निगेटिव्ह आढळले आहेत
व बारामती तालुक्यात पंधरा जण कोरोना बाधित आढळले असून 2 जण ग्रामीण भागातील व 13 जण शहरातील आहेत आज अखेर कोरोना रुग्णांची संख्या 251 झाली असून काल रात्री शहरातील अत्यवस्थ कोरोना ग्रस्त रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
शहरातील विवेकानंद नगर येथील तीस वर्षीय महिला, धुमाळवाडी येथील खजूर रुग्णाच्या संपर्कातील एक 29 वर्षीय पुरुष, प्रगतीनगर येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील दहा वर्षाचा मुलगा, वसंतनगर येथील चाळीस वर्षे पुरुष व तीस वर्षीय महिला, हरिकृपानगर येथील 58 वर्षीय महिला, मुजावरवाडा येथील 47 वर्षीय पुरुष, म्हाडा कॉलनी येथील 36 वर्षीय पुरुष, ढेकळवाडी येथील खताळपट्टा येथील 38 वर्षीय पुरुष, एमआयडीसीमधील साठ वर्षीय पुरूष, भोई गल्ली येथील 65 वर्षीय महिला व 40 वर्षीय पुरुष, भोई गल्ली येथील 11 वर्षीय मुलगा व 70 वर्षीय पुरुष व इंदापूर रोड येथील 35 वर्षीय पुरुष रुग्णास कोरोना ची बाधा आढळली आहे.
101 नमुन्यांपैकी 80 जण निगेटिव आले असून 9 प्रलंबित नमुन्यांचा अहवाल आला आहे. यामध्ये सहा जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बारामती शहरातील 68 वर्षीय महिला, गुणवडी तील 26 वर्षीय युवक, उर्जा भवन येथील वीस वर्षीय युवती, बारामती शहरातील 43 वर्षीय महिला , मोरेवाडी येथील 61 वर्षीय पुरुष व बारामती शहरातील 36 वर्षीय पुरुष या रुग्णांचा समावेश आहे. आता बारामतीतील रुग्ण संख्या 257 झाली आहे