-->
मोरगाव, सर्व दुकाने 22 तारखेपर्यंत बंद

मोरगाव, सर्व दुकाने 22 तारखेपर्यंत बंद

मोरगाव  :  अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती येथे खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या  डॉक्टरांना   कोरोनाची लागन झाली आहे .यामुळे  मोरगाव येथील सर्व  दुकाने  उद्या  मंगळवार दि. 18 पासून ते शनिवार दि. 22 पर्यंत  बंद ठेवण्यात येणार आहे.


                   गेल्या पाच महीन्यात मोरगांवपासुन ८ ते दहा किमी अंतरावर असलेल्या  मोढवे  ,मुर्टी ,लोणी भापकर , काळखैरेवाडी गावच्या हद्दीत कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले होते . मोरगाव ग्रामपंचायतीच्या विविध उपाय योजनांमुळे कोरोना जणु वेशीवरच अडवून ठेवला होता . मात्र आज  मोरगाव येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या  डॉक्टरांचा  कोरणा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे .


                   यामुळे  मोरगांव ग्रामस्थांची चिंता वाढली आहे .खबरदारीचा उपाय म्हणून मोरगांव ग्रामपंचायत , महसूल व आरोग्य विभाग यांच्याकडून  उद्यापासून  सर्व  दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे . उद्या  दिनांक १८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट पर्यंत  मोरगाव येथील सर्व व्यावसायिक दुकाने बंद राहणार आहेत .  यामध्ये मेडिकल व दवाखाने वगळता  गावातील सर्वच दुकाने  बंद ठेवण्याचे आवाहन  सरपंच निलेश केदारी  यांनी केले आहे.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article