बारामती, आज दिवसभरात 23 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 799
Sunday, August 30, 2020
Edit
कालचे उर्वरित 18 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी वाणेवाडी येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील दोन रुग्ण व बारामती शहरातील एक असे तीन जणांचा अहवाल rt-pcr पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे तसेच ग्रामीण रुग्णालय रूई येथे शासकीय एंटीजेन तपासणीसाठी एकूण पन्नास जणांचे नमुने घेण्यात आले होते त्यापैकी बारामती शहरातील 14 व ग्रामीण भागातील सहा जणांचा अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे उर्वरित 30 जणांचा अहवाल एंटीजेन निगेटिव्ह आले आहेत त्यामुळे आज दिवसभरात एकूण तेवीस जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीची रुग्ण संख्या 799 झाली आहे.