बारामती; आज दिवसभरात 26 जण कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या 582
कालच्या उर्वरित 23 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी बारामती शहरातील एक महिला व कांबळेश्वर येथील रुग्ण असे एकूण दोन रुग्ण परिवार आले आहेत व त्यातील बारामती शहरातील महिलेचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे बारामतीतील मूर्तींची संख्या 29 झालेली आहे तसेच आज बारामतीमधील खाजगी प्रयोगशाळेमध्ये दिवसभरात घेतलेल्या 42 नमुन्यांपैकी बारामती शहरातील सहा व ग्रामीण भागातील दोन असे आठ रुग्णांचा अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे व उर्वरित 36 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
आज दिवसभरात ग्रामीण रुग्णालय रुई येथे एकूण 34 नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 22 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बारामती शहरातील 10 व ग्रामीण भागातील दोन असे 12 जणांचा अहवाल एंटीजेन पॉझिटिव आलेला आहे तसेच बारामती शहरातील खाजगी प्रयोगशाळेमध्ये संध्याकाळनंतर घेण्यात आलेल्या 19 नमुन्यांपैकी बारामती शहरातील तीन व ग्रामीण भागातील एक असे चार नमुने एंटीजेन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यामुळे आज दिवसभरात एकूण 10+12+4=26 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीची रुग्ण संख्या 582 झालेली आहे.