-->
मास्क न वापरणाऱ्या 275 नागरिकांवर कारवाई करत वडगाव पोलिसांकडून सव्वा लाखांचा दंड वसूल

मास्क न वापरणाऱ्या 275 नागरिकांवर कारवाई करत वडगाव पोलिसांकडून सव्वा लाखांचा दंड वसूल

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडून मास्कचा वापर न  करणाऱ्या एकूण २७५ नागरिकांविरुद्ध कारवाई करत १,२६,७००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला  आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ही  कारवाई करण्यात आली. 
          वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन  कडून दिनांक २८/०८/२०२० ते दिनांक ३०/०८/२०२० रोजी पर्यंत ३ दिवसांच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी तसेच वाहन चालविताना मास्कचा वापर न  करणाऱ्या एकूण २७५ नागरिकांकडून १,२६,७००/- इतका रोख दंड आकारण्यात आलेला असून सोशल डिस्टन्स चे पालन न करणाऱ्या ६ नागरिकांविरुद्ध भा.द.वि १८८ प्रमाणे खटले दाखल करणेत आलेले आहेत. अशी माहीती वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे यांनी सा.बारामती दर्पणशी बोलताना दिली.  
       सदरची कामगिरी मा.श्री.संदीप पाटील सो.(भा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रा. , मा.श्री.मिलिंद मोहिते सो.(म.पो.से) अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रा., मा.श्री.नारायण शिरगावकर सो. (म.पो.से) उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, पुणे ग्रा.,यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी श्री.सोमनाथ लांडे ( सहाय्यक पोलीस निरीक्षक ) यांचे पथकाकडून करणेत आलेली आहे.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article