कोऱ्हाळे बुद्रुक येथील 3 शेतकऱ्यांनी मिळून खरेदी केले ऊसतोडणी यंत्र
कोऱ्हाळे बु|| - येणाऱ्या साखर गळीत हंगामात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऊसतोडणी मजुरांचा तुटवडा जाणवणार आहे. यामुळे बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्याने सभासदांनी ऊस तोडणी यंत्र घेण्यासाठी आवाहन केले होते. याला कोऱ्हाळे बु येथील तीन शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत तब्बल सव्वा कोटी रुपयांचे ऊसतोडणी यंत्र घेतले आहे.
कोऱ्हाळे बु!! येथील शेतकरी संदीप बाळासो खोमणे, रवींद्र संपत खोमणे आणि विठ्ठल निवृत्ती भगत यांनी भागीदारीत हे ऊसतोडणी यंत्र खरेदी केले आहे. यासाठी या पणदरे येथील बँक ऑफ इंडिया या बँकेने या शेतकऱ्यांना ५० लाख कर्ज उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये ९२ लाखाचे ऊसतोडणी यंत्र व तीन ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेतले आहे. पूर्वीचे या शेतकऱ्यांकडे सहा टॅक्टर आहेत.
नुकतेच कोऱ्हाळे बु या ठिकाणी सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुनील भगत यांच्या या यंत्राचे पूजन पार पडले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.