-->
बारामती, आणखी 30 जण कोरोना बाधित, कोऱ्हाळे बु, कांबळेश्वर, पणदरे इ. येथील ग्रामीण रुग्णांचा समावेश, एकूण 503

बारामती, आणखी 30 जण कोरोना बाधित, कोऱ्हाळे बु, कांबळेश्वर, पणदरे इ. येथील ग्रामीण रुग्णांचा समावेश, एकूण 503

दिनांक  20/ 8 /20 रोजी rt-pcr तपासणीसाठी घेतलेल्या 138 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये एकूण 118 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बारामती शहरातील 9 व ग्रामीण भागातील 8 असे सतरा जणांचा अहवाल rt-pcr पॉझिटिव आला असून इंदापूर तालुक्यातील तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत शहरातील पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये आमराई येथील एक, तांदूळवाडी येथील एक, सूर्यनगरी येथील दोन, कसबा येथील एक, बारामती शहरातील 2, डॉमिनोज पिझ्झा हट शेजारील एक व उपजिल्हा रुग्णालयातील एक शासकीय वैद्यकीय अधिकारी असे नऊ जणांचा समावेश आहे तसेच पंधरे येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील एकाच कुटुंबातील सहा जण व काटेवाडी येथील 2 असे ग्रामीण भागातील आठ असे एकूण 17 रुग्ण rt-pcr पॉझिटिव्ह आले आहेत


        तसेच बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेमध्ये  काल एकूण 45  नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी शहरातील आठ व ग्रामीण भागातील 5 असे 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत एंटीजेन पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील देसाई इस्टेट मधील एक, अशोक नगर मधील एक, सिद्धार्थ नगर हौसिंग सोसायटीमधील एक, अंबिका नगर मधील एक ,हरिकृपा नगर मधील एक, नक्षत्र गार्डन येथे एक, संगवीनगर येथील एक व तांदुळवाडी येथे एक असे आठ रुग्ण व करंजेपुल येथील  एक माळेगाव येथील दोन, कोऱ्हाळे बुद्रुक येथील एक व कांबळेश्वर येथील एक असे पाच व एकूण 13 एंटीजेन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत.


         त्यामुळे काल दिवसभरात एकूण 30 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत व बारामतीची रुग्ण संख्या 503 झाले आहे  त्याचप्रमाणे कालपर्यंत बारामतीतून बरे झालेल्यांची संख्या 244 आहे त्यामुळे बारामतीकरांना प्रशासना मार्फत आवाहन करण्यात येते की कोरोनाला घाबरू नका परंतु काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका तसेच 60  वर्षावरील व्यक्ती व कोमोर्बीड  व्यक्ती यांनी घराबाहेर पडू नये व घरांमध्ये सुद्धा अलगीकरणामध्ये राहावे तसेच  इतरांनी सुद्धा कामासाठी बाहेर पडताना मास्क वापरावा, सॅनीटायजरचा वापर करावा व सोशल डिस्टंसिंग पाळावे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article