कोऱ्हाळे बु, पणदरे, वडगांव, मुर्टी येथील रुग्णासह बारामती तालुक्यात तब्बल 38 जण कोरोना पॉझिटिव्ह, एकूण 385
बारामतीतील आज 38 जण कोरोना बाधित ; खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी तालुक्यातील 23 जण कोरोना बाधित ; शासकीय तपासणीत 15 जण कोरोना बाधित.
खाजगी प्रयोगशाळेतील 23 तर शासकीय तपासणीत 15 जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
आज खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात तब्बल 23 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर खंडोबानगर येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा ग्रामीण रुग्णालय रुई येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 23 झाली आहे.
खाजगी प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीत हरिकृपानगर येथील 34 वर्षीय पुरुष, पाहुणेवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, शिरवली येथील 34 वर्षीय महिला, बुरुडगल्ली येथील 32 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 42 वर्षीय पुरुष, शहरातील कसबा येथील शहानुर मंजील मधील 42 वर्षे पुरुष, अनेकांत स्कूल शेजारील 34 वर्षीय पुरुष, कार्हाटी येथील 48 वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी येथील 21 वर्षीय महिला, ढवाणवस्ती फलटण रोड येथील 22 वर्षे महिला, कॅनॉल रोड येथील 24 वर्षीय महिला, मूर्टी येथील 56 वर्षीय पुरुष, याच कुटुंबातील 63 वर्षीय महिला, 51 वर्षीय महिला व 63 वर्षीय महिला, पणदरे येथील तीस वर्ष महिला, सिनेमा रोड येथील 35 वर्षीय पुरुष, आमराई शिवाजीनगर येथील 32 वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर येथील 74 वर्षीय पुरुष, आमराई येथील राजा अपार्टमेंट येथील 42 वर्षीय पुरुष, कॅनॉल रोड येथील 20 वर्षीय महिला, त्याच कुटुंबातील पन्नास वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
बारामतीत झालेल्या शासकीय तपासणीत 15 जण कोरोना बाधित आढळले असून यामध्ये कसबा येथील 65 वर्षीय पुरुष, तुळजाराम चतुरचंद कॉलेज येथील 66 वर्षीय महिला व 34 वर्षीय महिला, ढेकळवाडी येथील 54 वर्षे पुरुष, तांबे नगर येथील 29 वर्षीय पुरुष, तुळजाराम चतुरचंद कॉलेज येथील 42 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 23 वर्षीय पुरुष, कसबा येथील 55 वर्षीय पुरुष, जळगाव कडेपठार येथील 41 वर्षे पुरुष व 43 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 56 वर्षीय महिला, कल्याणीनगर येथील 57 वर्षीय पुरुष, मेडद येथील साठ वर्षीय पुरुष येथीलच 32 वर्षीय महिला, देसाई येथील 47 वर्षीय महिला व 42 वर्षीय महिला त्यांचा समावेश आहे
बारामतीची रुग्ण संख्या 385 झालेली आहे तर मृतांची संख्या 23 झाली आहे.
बारामतीमध्ये वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता बारामतीकरांना आवाहन करण्यात येते की आपण अनावश्यक घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व सॅनिटायझरचा व मास्कचा वापर करावा तसेच ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये व घरातील तरुणांनी घरात आल्यानंतर सुद्धा नागरिकांपासून अंतर ठेवून राहावे जेणेकरून आपणाला कोरोणापासून बचाव करता येईल