बारामती, आज 42 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 722
काल बारामती मध्ये एकूण 145 नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 90 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 26 जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे तसेच बारामती बारामती शहरातील 17 जणांचा व ग्रामीण भागातील दहा जणांचा असे 27 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून इंदापूर तालुक्यातील दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तसेच काल ग्रामीण रुग्णालय रुई येते शासकीय एंटीजेन तपासणीसाठी एकूण 33 नमुने घेण्यात आले होते त्यापैकी पाच जणांचे अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आले असून 28 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तसेच काल बारामती मध्ये खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 62 जणांचे नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी बारामती शहरातील आठ व ग्रामीण भागातील दोन असे दहा जणांचा अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आला असून 52 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे त्यामुळे आज सकाळपर्यंत बारामती मध्ये एकूण 27 rt-pcr पॉझिटिव्ह + 5 शासकीय एंटीजेन पॉझिटिव्ह + 10 खाजगी एंटीजेन पॉझिटिव्ह = 42 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामध्ये बारामती शहरातील तीस व ग्रामीण भागातील बारा रुग्णांचा समावेश आहे तसेच आजपर्यंत बरे झालेल्यांची संख्या 389 झालेली आहे व बारामतीतील मृत्यूंची संख्या 31 झालेली आहे
शहरांमध्ये आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये आमराई येथील दोन,जामदार रोड येथील 2, सूर्य नगरी येथील दोन, तावरे बंगल्याशेजारी 4, इंदापूर रोड येथील 2,रुई येथील दोन, श्रीराम नगर येथील दोन, तसेच महावीर भवन येथील एक, सातव वस्ती येथील एक, कसबा येथील एक, गिरिराज हॉस्पिटल येथील एक, खंडोबानगर येथील एक, खत्री पार्क येथील एक, राम गल्ली येथील एक, भिगवन रोड येथील एक, हरिकृपानगर येथील एक, तांबे नगर येथील एक, पाटस रोड येथील एक, सिद्धांत नगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे तसेच बारामती तालुक्यातील जळगाव कप येथील एक,उंडवडी येथील एक, पणदरे येथील दोन,अंजनगाव येथील एक, निरावागज येथील एक, पिंपळी येथील एक, माळेगाव बुद्रुक येथील एक, सोनवडी सुपे येथील एक, शिवनगर येथील एक व गुणवडी येथील एका रुग्णाचा समावेश आहे
बारामतीची एकूण रुग्ण संख्या 722 झालेली आहे