कोऱ्हाळे, वडगांव, माळेगाव, सोमेश्वर सह आज 43 जण पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 675
काल बारामती मध्ये एकूण 134 नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 89 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बारामती शहरातील 15 व व तालुक्यातील 14 असे 29 जणांचा अहवाल rt-pcr पॉझिटिव्ह आलेला आहे तसेच इंदापूर तालुक्यातील सात व इतर तालुक्यातील चार अहवाल देखील पॉझिटिव्ह आलेले आहेत व पाच जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे, तसेच बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेचा रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये शहरातील 12 व ग्रामीण भागातील दोन असे 14 अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे काल संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत एकूण रुग्ण संख्या 29 rt-pcr पॉझिटिव्ह+ 14 एंटीजेन पॉझिटिव्ह =43 झालेली आहे तसेच बारामतीतील एकूण रुग्णसंख्या 675 झाली आहे
आज rt-pcrपॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये आमराई परिसरातील तीन, कसबा श्रीराम नगर येथील 2, बुरुड गल्ली येथील एक, पेन्सिल चौकातील एक, डायनामिक कॉलनी येथील एक , कल्याणीनगर येथील 2, सिद्धार्थनगर येथील एक, निर्मिती विहार सोसायटीतील एक,देसाई इस्टेट येथील 2,पंचायत समितीतील एक तसेच ग्रामीण भागामध्ये गवारे फाटा मळद येथील तीन, तसेच सोनवडी सुपे येथील चार, कारखेल येथील तीन, कोऱ्हाळे बुद्रुक येथील एक, माळेगाव येथील एक, सोमेश्वर येथील एक, वडगाव निंबाळकर येथील एक असे 29 रुग्ण व एंटीजेन पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मुक्त विहार सूर्यनगरी येथील दोन, प्रगतीनगर येथील 2, देसाई इस्टेट येथील 2, कसबा श्रीराम नगर येथील दोन, भंडारे हॉस्पिटलच्या पाठीमागील दोन,भिगवन रोड जळोची येथील एक,दत्तकृपा अपार्टमेंट बारामतीतील एक व ग्रामीण भागामध्ये गुणवडी येथील एक आणि कऱ्हावागज येथील एक अशा रुग्णांचा समावेश आहे