-->
दरोड्यातील पावणेचार कोटींची सिगारेट, 43 लाख रोख रक्कम व कंटेनर फिर्यादीला परत

दरोड्यातील पावणेचार कोटींची सिगारेट, 43 लाख रोख रक्कम व कंटेनर फिर्यादीला परत

कोऱ्हाळे बु- दि .३० / ११ / २०१ ९ रोजी दुपारी ३ वा चे सु ।। वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीत मौजे सस्तेवाडी गावचे हददीत निरा बारामती रोडवर मगरवस्ती जवळ अल्टो कार मधुन ए टी एम मध्ये पैसे भरणेसाठी निघालेल्या गाडीला पाठीमागुन दोन मोटारसासकल स्वारानी चाकुचा धाक धाकवुन रोख रक्कम ४३००००० / - रू चा दरोडा टाकुन आरोपी पळुन गेले होते सदर गुन्हयातील ७ आरापींना अटक करूण , संपुर्ण रक्कम जप्त करण्यात आली होती



सदर बाबत वडगाव निबाळकर पोलीस स्टेशन ला गु.रजि.नं .५०७ / २०१ ९ भादवि ३ ९ ५,३४१ प्रमाणे दाखल होता . सदर गुन्हयातील ४३ लाख रू रोख रक्कम ही मा . न्यायालयाचे आदेशाने फि ।। यांचे ताब्यात देण्यात आली आहे . तसेच दि २४/६/२०२० रोजी सकाळी ११.०० वा सुमाराम ITC सिगारेट कंपनी रांजणगाव येथुन आयशर ट्रक न NL 01 L 4339 या ट्रकमध्ये ITC कंपनीमध्ये तयार झालेली फिल्टर सिगारेट बॉक्स असा किमंत ४,६१८८८२०.६७ ( चार कोटी एकसष्ट लाख , अठठयाऐंशी हजार आठशे वीस ) रू चा माल भरून तो राजणगाव एम आय डी.सी. ते हुबळी राज्य कर्नाटक या ठिकाणी घेवुन जाणेसाठी राजणगाव एम आय डी सी -न्हावरा - पारगाव - केडगाव चौफुला -सुपा मार्गे हुबळीकडे जात असताना दुपारी २.०० वा सुमा मोरगाव ता बारामती गावचे हददीत १३ अनोळखी इसमाने सिगारेट सह ट्रक लुटला होता . सदर बाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु . रजि नंबर ३१४/२०२० भादवि ३ ९ ५,३ ९ ७,३४१ , शस्त्र अधिनियम ४,२५ प्रमाणे दाखल असुन त्याप्रकरणी मध्यप्रदेश राज्यातील एकुण ७ आरोपींना दि .२६ / ६ / २०२० रोजी अटक केली होती सदर गुन्हातील ३,८ ९ ३४७ ९ २ ( 3 कोटी 89 लाख , चौतीस हजार सातशे ब्यान्नव ) चा आय.टी.सी कंपनीचा सिगारेटचा बॉक्स व ट्रक जप्त करण्यात आला असुन सदर गुन्हयातील सिगारेट व ट्रक हा मा . न्यायालयाचे आदेशाने फिर्यादीचे ताब्यात दिला आहे . वरिल दोन्हीही गुन्हयाचा तपास मा . पोलीस अधिक्षक सो मा.संदिप पाटील भा.पो.से. , अपर अधिक्षक बारामती विभाग मा . मिलींद मोहिते , बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायन शिरगावकर , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा . पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा . पोलीस निरीक्षक एस व्ही लांडे सो यांनी केला व मुददेमाल कारकुन म्हणुन सहा फौज एस बी वेताळ यांनी कामकाज कले.



 


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article