बारामती, आज दिवसभरात तब्बल 68 जणांना कोरोनाची लागण
काल घेतलेल्या नमुन्यांपैकी उर्वरित 26 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये शहरातील एक व ग्रामीण भागातील एका जणाचा अहवाल rt-pcr पॉझिटिव्ह आलेला आहे व 24 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे तसेच आज दिवसभरामध्ये खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 39 जणांचे नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी शहरातील सात व ग्रामीण भागातील तीन असे एकूण दहा जणांचे अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आलेले आहेत व 29 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालय रुई येथे आज दिवसभरात एकूण 38 जणांचे नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी शहरातील 11 आणि ग्रामीण भागातील तीन असे एकूण 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे सकाळपासून आत्तापर्यंत एकूण 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून आज दिवसभरातील संख्या 42+ 26 =68 झालेली आहे व बारामतीची रुग्णसंख्या 748 झालेली आहे