-->
गौराई माझ्या लाडाची; साधेपणाने झाले आगमन... 

गौराई माझ्या लाडाची; साधेपणाने झाले आगमन... 

सोमेश्वरनगर प्रतिनिधी 


गौरी गणपती हा सण  महाराष्ट्रात दरवर्षी  उत्साहात  सर्व महिला साजरा करत असतात  त्याच प्रमाणेनेच लाडक्या गौराईचे  थाटात याहीवर्षी  गौरीचे आगमन झाले आहे  परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी महिलांच्या जिव्हाळ्याचा हा सण केवळ कुटुंबीयांच्या उपस्थितीत झाला.


कोरोनाच्या सावटामुळे बाजारातही वस्तू खरेदी करण्यासाठी महिला भयबीत असल्याने त्यांनी थोडीफार खरेदी धाकधूक वाटत केली. गौरीच्या साड्या खरेदी करण्यापासून ते मुखवटे, दागदागिने व विविध देखाव्यांसाठी लागणारे साहित्य व डेकोरेशनसाठी महिलांची बाजारात लगबग दिसून येते. मात्र, घरी कोणालाही बोलावता येणार नसल्याने ब-याच सखींनी साध्या पद्धतीने गौरी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. गौरीच्या आगमनादिवशीही पाच सुवासिनींना बोलावून गौरी बसविल्या जातात.



या वर्षी मात्र, कुटुंबापुरताच हा सण मर्यादित राहणार असल्याने।- " व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर " केवळ सजावटीचे फोटो शेअर केले जाणार . 


  दरवर्षी महिलांची व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप व कॉल करून मैत्रिणी व नातेवाइकांना आमंत्रण देण्याची गडबड असते.व त्याचा सर्व मित्र मंडळी व कुटूंब सदस्य ही आनंद घेत असतात.


 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गौराईचे आगमन साधेपणात झाले असले तरी कुटुंब महिलांचा उत्साह मात्र तोच होता , घरोघरी सजावट व विविध आरास, रोषणाई सुरू आहे. सोळा प्रकारचे पंचपक्वान्न, सोळा भाज्या व विविध फळांच्या कोशिंबिरीचा नैवेद्य गौराईला असतो. यासह पुरणपोळीचा बेतही कुटुंबीयांपुरताच राहणार 
असल्याचे ..संगीता घोलप यांनी सांगितले.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article