बारामती, आज 8 जण पॉझिटिव्ह, एकूण 466
Thursday, August 20, 2020
Edit
बारामती- काल एकूण 135 नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 93 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 38 जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे व बारामती शहरातील तीन आणि तालुक्यातील एक असे चार रुग्ण rt-pcr पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्याचप्रमाणे बारामती येथील खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 26 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 22 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून बारामती शहरातील फलटण रोड कसबा येथील एकाच कुटुंबातील तीन रुग्ण व सपना नगर बारामती येथील एक रुग्ण असे एकूण चार एंटीजेन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे आज दिवसभरात बारामती शहरातील सात व ग्रामीण भागातील एक असे आठ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत व बारामतीची रुग्ण संख्या 466 झालेली आहे.