कोरोनापासुन मुक्तीसाठी त्यानी केली अशीही प्रार्थना...
करंजेपुल (सोमेश्वरनगर ) ते कडेपठारचा महाराज खंडोबाराया पर्यन्त चा २९ किमी डोंगर दऱ्यातुन पायी प्रवास करीत रविवारी पुर्ण केला.व उतरण मिळुन ३१.५ किमी चा प्रवास ६ तास ५२ मिनिटात पुर्ण केला . लॉकडावुन मुळे मंदीर बंद असल्याने बाहेरुनच खंडोबारायाचे दर्शन घेत सोशल डिस्टंसींग चे पालन करत कडेपठारचा राजा मल्हारी याला जगावरचे कोरोना संकट लवकर दुर होवु देत अशी प्रार्थना या सर्वानी केली.
या अगोदर सलग तीन वर्ष खंडोबा चे दर्शन दर शनिवारी करायचो मात्र लॉकडावुन मुळे अनेक महिने वारी झाली नव्हती याची खंत असल्याने व कोरोनाचे संकट देखील कष्टप्रद असल्याने आम्ही कष्टाचा निर्धार करुन खंडोबाला साकडे घातले . सोमेश्वर व्यायाम गृप च्या आमचे सहकारी राज्य शिक्षक संघटनेचे सरचिटणीस केशव जाधव ,ॲड गणेश आळंदीकर ,आरोग्य कर्मचारी परवेझ मुलाणी ,शिक्षक दादासाहेब भंडलकर गुरुजी ,सामाजीक कार्यकर्ते मदनराव काकडे देशमुख ,रविंद्र पवार उर्फ हरि ॐ ,संभाजी गायकवाड या सर्वानी खंडोबाला साकडे घातले .
सोमेश्वर व्यायाम गृप च्या या सदस्यानी या अगोदर केलेल्या विविध हरिश्चंद्रगड ,तोरणा गड ,राजगड ,वासोटा व्याघ्र गड ,जरंडेश्र्वर,करंजेपुल ते सोमेश्वर मंदीर श्रावणात चालत जाणे वै ट्रेक केले होतेच . किल्ल्याचा अनुभव आमच्या पाठीशी होताच तसेच सलग तीन वर्ष कडेपठार दर शनिवारी, कडेपठार ते जेजुरी खंडोबा, वाघाई कडील उतरण पलीकडे जाणाई कडची उतरण बराच अनुभव पाठीशी होता त्यामुळे हे शक्य झालेचे ॲड गणेश आळंदीकर व मदन काकडे म्हणाले . मोजके धोकादायक तीन चार टप्पे सोडले तर हा ट्रेक तसा फार धोकेदायक नव्हता मात्र लांबीच्या दृष्टीने २९ किमी जाणे व परत उतरण असे ३१.५ किमी खुप होते .
करंजेपुल येथे पहाटे साडेपाच ला आमचे जेष्ठ सदस्य केशव जाधव गुरुजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन या सर्वानी कोरोनामुक्त जगाची प्रार्थनाही कठोर कष्ट करुन करायची हे ठरवुन सरळ रस्ता न अवलंबता करंजेपुल ( सोमेश्वरनगर ) वरुन रुपाडी आई देवीचा डोंगर ,गाठुन आठ किलोमीटर वर तिच्या दर्शनाला पोहोचलो तिथुन पुढे ब्राम्हणदरा ,कर्नलवाडी ,राख ,बाळाजीची वाडी ,बहिर्जीची वाडी या गावातुन डोंगर दऱ्या,शेतजमीन ई रस्त्याचा अवलंब करुन दौंडज रेल्वे स्टेशन जवळुन दौंडज खिंडीत पोहोचले . वाटेत सलग साडेतीन तासाच्या प्रवासानंतर एका माळरानावर थोडा नास्टा केला .दौंडज खिंडीतुन कडेपठार अंतर पाच सहाच किमी राहीले होते. मात्र तेथे अवघड चढणी चे दोन तीन टप्पे व त्या अगोदर रुपाडी देवीच्या पुढुनची अवघड उतरण असे टप्पे सावधपणे पार केले . वाटेत धनगर समाजातील अनेक लोक आपापली बकरी चरायला सोडुन माळरानावर बिनधास्त वावरताना याना दिसली यंदा पाऊसपाणी झाल्याने त्यांच्या मनावर समाधान होते मात्र सरकारने आता मंदीर उघडावीत कारण त्यावर उपजिविका करणाऱ्याचे हाल होत आहेत अशा भावना त्यानी व्यक्त केल्याचे केशव जाधव यानी सांगीतिले . चढ उतारांची कसरत करीत अगदी वातावरणात थंडावा निर्माण करणाऱ्या हलक्या रिमझीम पावसाच्या साथीने हे सर्वजण २८.७५ किमी चे अंतर ६ तास ७ मिनिटात पुर्ण केले व कडेपठार खंडोबा देवस्थान परिसरात पोहोचले . लॉकडावुन मुळे मंदीर बंद असल्याने बाहेरुनच दर्शन करीत " जय मल्हार चा जयघोष करीत खंडेराया जगावरचे कोरोना संकट दुर कर अशी प्रार्थना केली . त्यानंतर त्यानी सोबत नेलेल्या डब्यातुन जेवण करुन श्रावण महिन्यात एक मोठा ट्रेक केल्याचे समाधान परवेझ मुलाणी यानी व्यक्त केले. त्याचबरोबर पायी केलेल्या वारीतुन आपल्या शारीरिक क्षमतेचे समाधान ,कोरोनाचे संकट दुर होण्याची आशा घेवुन आम्ही आमच्या सोमेश्वर व्यायाम गृप चे सदस्य परतीची अडीच किलोमिटर ची उतरण असलेल्या रस्त्याची उतरण सहज पार केली व एक अद्भुत ,अविस्मरणीय ट्रेक व कठोर त्रास घेवुन कोरोनाचे संकट दुर करण्यासाठी खंडोबाला घातलेले साकडे.. मनाला मोठे समाधान देवुन गेले असे मत सर्वानीच व्यक्त केले .