पुरंदर-भोरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना आंतरिक सेवापदक प्रदान
निरा- पुरंदर-भोरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांना पुणे येथे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
आण्णासाहेब जाधव यांनी गडचिरोली मध्ये ऑगस्ट २०१५ ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत उपविभागीय पोलिस अधिकारी या पदावर कार्यरत असताना असताना अतिशय कठीण परिस्थितीत काम केले होते.तेथील नक्षलवाद आटोक्यात आणण्या साठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.त्या भागातील लोकांशी संवाद साधून त्यांना मुख्य प्रवाहात सामील केले,तरुणांचे समुपदेशन केले त्यामुळे तेथील नक्षल वाद घटला.त्यांच्या या कामगिरी बद्दल त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आंतरिक सेवापदक जाहीर करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधीन जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथील कौनशील हॉल येथे हे सेवा पदक त्यांना प्रदान करण्यात आले. जाधव हे आता पुणे जिल्यातील भोर उप विभागाचे उप विभागीय अधिकारी म्हणून काम करीत आहेत.या भागात आल्या पासून ते जनतेशी संवाध ठेवून आहेत.अनेक सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो. पूरग्रस्तांना मदत असो, किवा गोर गरीब मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असो ते नेहमीच तालुक्यातील सामाजिक संस्थांच्या खड्याला खांदा लावून कामा करतात.त्यामुळे पुरंदर व भोरच्या जनतेत त्यांच्या विषयी आदर निर्माण झाला आहे. सामाजिक कामातून आदर व पोलिसी कारवाईतून गुन्हेगारांवर वचक आहे.त्यामुळे या भागातील गुह्नेगारीला आळा बसला आहे.यापुर्वी आण्णासाहेब जाधव यांना गडचिरोली येथील उल्लेखनीय कार्यामुळे सन २०१८ मध्ये पोलिस महासंचालकांचे सन्मान चिन्ह, सन २०१९ मध्ये राज्य सरकारने विशेष सेवा पदक बहाल करून सन्मानित करण्यात आले आहे.