-->
सासवड विभागातील सोमेश्वर उपविभाग, बारामती विभागास जोडणेचा प्रस्तावाला महावितरण कडून मंजुरी

सासवड विभागातील सोमेश्वर उपविभाग, बारामती विभागास जोडणेचा प्रस्तावाला महावितरण कडून मंजुरी

बारामती तालुक्यातील पश्चिम भाग , मोरगांव व सुपे परगणा परिसरातील गावे ही महावितरण कंपनी सासवड विभागाला सन .२०० ९ सालापासुन जोडली आहेत . त्यामुळे जवळपास ४१ हजार व्यवसायिक , शेतीपंपधारक शेतकरी व घरगुती विद्युत ग्राहक यांना दुरूस्ती , नवीन कनेक्शन , नवीन ट्रन्सफॉर्म व दुरूस्ती , व्यायवसायिक ग्राहक , स्ट्रेटलाईट सह अनेक कारणांसाठी मागणी व मंजुरीसाठी सासवडला जावे लागत होते . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महावितरणच्या अनेक कामांबाबत लोकांची मागणी घेतली असता अनेक ग्रामपंचायती व शेतकऱ्यांनी सोमेश्वर उपविभाग सासवड विभागा ऐवजी बारामती विभागाला जोडावा अशी मागाणी पक्षाकडे केली होती . त्याच अनुषंगाने मा.ना.अजितदादा पवार सो . उपमुख्यमंत्री यांचे दि .४ / ०७ / २०२० चे बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री.संभाजी होळकर यांनी तालुक्यामध्ये सर्व विभागीय कार्यालये उदा.पोलीस , कृषी , एस.टी , नगररचना , आर टी.ओ , बांधकाम , महसुल , विद्युत , पंचायत समिती , पाणी पुरवठा , दवाखाने , इ . शासकीय कार्यालये व सर्व सहकारी संस्थांची कार्यालये बारामती मध्ये असताना फक्त महावितरणचे विभागीय कार्यालय हे सासवड या ठिकाणी आहे त्यामुळे सर्वानाच त्याचा त्रास सहन करावा लागतो . छोटया छोटया कामासाठी शेतकरी व ग्राहक यांना ६० ते ८० कि मी पर्यंत जावे लागते व त्यामुळे वेळ व पैसा खर्च होतो याबाबत सविस्तर असे मत मांडुन दादांना माहिती दिली त्यावेळी बारामती दुध संघाचे चेअरमन श्री.संदिप जगताप , पंचायत समितीचे उपसभापती श्री.प्रदिप धापटे व मार्केट कमिटी सभापती श्री.अनिल खलाटे यांनीही त्याबाबत आपली मते मांडली . त्याच अनुषंगाने मा.ना.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी सदरचा प्रस्ताव तातडीने प्रादेशिक संचालक म.रा.वि.वि.कं यांचेकडे पाठविण्याच्या सुचना मुख्य अभियंता यांना दिल्या होत्या.


 


        मुख्य अभियंता श्री.सुनिल पावडे , अधिक्षक अभियंता श्री.चंद्रशेखर पाटील यांनी हा प्रस्ताव तातडीने तयार केला . जवळपास ४५ ग्रामपंचायती व महसुल गावे सोमेश्वर उपविभागामध्ये सामाविष्ठ आहेत . या गावातील ४१ हजार -पेक्षा जास्त ग्राहकांना परत . बारामती विभागास जोडण्याचे काम राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांचे आदेशानुसार सोमेश्वर उपविभाग बारामती विभागास जोडणेचा आदेश मुख्य महाव्यवस्थापक ( मासं ) यांनी कालच काढला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.संभाजी होळकर यांनी सांगितले आहे . या बाबत सर्व पाठपुरावा मुख्य अभियंता श्री.सुनिल पावडे व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष श्री.संभाजी होळकर यांनी केला . या निर्णयाचे स्वागत बारामती तालुका पश्चिम विभाग, सुपा व मोरगांव विभागाकडुन करण्यात येत आहे. 



 


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article