बारामती, बलात्कार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
सुपे - बाबुर्डी ता बारामती नजीक खोरेमळा येथील शुभम दिलीप खोरे या तरुणावर बलात्कार प्रकरणी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे .गेल्या तीन वर्षापासून तरुणीशी तो जबरदस्तीने बलात्कार होता.
सुपा ता बारामती येथे शिकत असताना सुपा परीसरातील एका मुलीशी शुभम खोरे याने फेसबुकद्वारे मैत्री केली. प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर संबंधीत तरुणीकडे शरीरसुखाची मागणी करत होता. सुपा येथून पुढील शिक्षणासाठी सदर तरुणी टी.सी. कॉलेज बारामती येथे गेली . यावेळी शिक्षण घेत असताना सण २०१९ , २०२० व ८ जुलै २०२० रोजी बारामती येथील यशवंत लॉज मध्ये या तरुणीस नेवुन वेळोवेळी संभोग केला.
फिर्यादी मुलीने शुभम खोरे यास आपल्याबरोबर लग्न करण्याची मागणी केली असता तरुणाने नकार दिला आहे . काय करायचे ते कर अशी धमकी दिली .या संबंधीत प्रकरणी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशला भादवी कलम ३७६ ,५०६ , ३५४ ( ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर घटनेचा पुढील तपास पोसई कवितके करीत आहेत .