स्वतंत्रदिनानिमित्त निरेतील कोरोना योद्ध्यांचा सन्मान
नीरा येथे स्वातंत्रदिना निमित्त कोरोना व लॉकडाऊनच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. निरा - शिवतक्रार ग्रामपंचायतीच्यावतीने आरोग्य कर्मचारी, पोलीस, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व पत्रकारांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
निरा (ता.पुरंदर) ग्रामपंचायतीचा १५ ऑगस्ट स्वातंत्रदानाचा ध्वजरोहण सोहळ्या नंतर ग्रामपंचायतीच्या जेष्ठ नागरिक सभागृहात सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापरकरत छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी निरा - शिवतक्रार ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य कर्मचारी, पोलीस, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व पत्रकारांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
निरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्र्विन घाटगे यांना सरपंच दिव्या पवार यांनी सन्मानीत केले. नीरा मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ.राम रणनवरे व डॉ.निरंजण (उर्फ चकोर) शहा यांना पुरंदरचे उपसभापती प्रा.डॉ. गोरखनाथ माने यांनी सन्मानीत केले. आरोग्य सहाय्यक व सेवक गणेश जाधव, शिवाजी चव्हाण, बापू भंडलकर यांना माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले यांनी सन्मानीत केले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नर्स, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका मदतनीस, यांना ही सन्मानीत करण्यात आले.
निरा पोलीसांनी खडा पहारा देत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवत गावात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतल्याबद्दल पोलीस हवालदार सुरेश गायकवाड, राजेंद्र भापकर, सुदर्शन होळकर, निलेश जाधव, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, घंटागाडी चालक व प्रसिद्ध निवेदक बाजिराव धायगुडे यांना ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तर नीरा शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करत कोरोनाच्या अपडेट सर्वात पहिल्या सोशल मीडिया व दैनिकांतून प्रसिद्ध केलेल्या व लोकांना मधिल कोरोनाची भिती दुर केली. त्याबद्दल नीरा शहर पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ननवरे, राहुल शिंदे, भरत निगडे,मोहम्मदघोस अतार, रामदास राऊत, श्रद्धा जोशी यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिव्या पवार होत्या. पंचायत समितीचे उपसभापती गोरखनाथ माने, अॅड आदेश गिरमे, सुदाम बंडगर, भाऊसाहेब धायगुडे उपस्थीत होते. ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, दिपक काकडे, भरत निगडे, डॉ राम रणनवरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन व व्यवस्थापन ग्रामपंचायतीचे कर्मचारी गणिभाई सय्यद, सचिन ठोंबरे, लक्षमण उर्फ पप्पू जाधव, अजय काकडे, अविनाश माने यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सदस्य अनिल चव्हाण यांनी केले तर आभार बाळासाहेब भोसले यांनी मानले.