-->
मोरगाव- मयुरेश्वराची भाद्रपदी यात्रा रद्द

मोरगाव- मयुरेश्वराची भाद्रपदी यात्रा रद्द

मोरगाव :  अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता.बारामती येथील भाद्रपद यात्रा उत्सव  कोरोना  या विषाणूजन्य आजाराच्या वाढत्या फैलावामुळे संपन्न होणार नाही . तसेच मयुरेश्वर मंदिर बंद असल्याने  यात्रा काळात  भाविकांना मुक्त दर्शनाचा लाभ घेता येणार नसून  केवळ धार्मिक पूजाअर्चा होणार असल्याची माहिती विश्वस्त चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त  विनोद पवार  यांनी दिली .



 मोरगांव येथील  भाद्रपद  यात्रा उत्सव  भाद्रपद शुद्ध प्रतीपदा दिनांक १९   ते भाद्रपद शुद्ध पंचमी  दिनांक  २३   या  तारखेस आला आहे . यात्रा काळात दरवर्षी  सर्व धर्मीयांना  मुक्तद्वार दर्शनाच्या निमित्ताने  श्रींचा  मुख्य  गाभारा खुला करण्यात येतो  .यानिमित्ताने श्रींना  जलस्नान घालण्याची पर्वणी साधता येते . मात्र कोरोना  या विषाणूजन्य आजाराच्या वाढत्या फैलावामुळे मयुरेश्वर मंदिर बंद आहे. राज्य शासनाच्यावतीने  मंदिर उघडण्याबाबतचे  अद्याप पर्यंत कुठलेही  अध्यादेश दिलेले नाही .



यात्रा काळ जरी असला तरी  मंदीर व मुक्तद्वार दर्शन बंद असल्याने  भाविक भक्तांनी मोरगाव येथे दर्शनासाठी न येण्याचे आव्हान चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे. कोरोनामुळे  चिंचवड येथून येणारा महासाधु मोरया गोसावीप्राप्त मंगलमुर्ती पालखी सोहळा यंदा गाडीतुन  केवळ दहा लोकांच्या उपस्थितीत  येणार आहे . तसेच  दरसाला प्रमाणे मंगलमुर्तीची गावातुन रात्री होणारी मिरवणूक रद्द केलेली आहे. त्याचप्रमाणे मयुरेश्वरास या वर्षी सुवर्णालंकार युक्त पोशाख चढविला जाणार नसून नेहमीचेच पोशाख चढविले  जाणार आहेत  . 



मात्र  परंपरेने चालत आलेल्या  धार्मिक पूजाअर्चा होणार आहे .  कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता भाविकांनी कळस दर्शन  , पायरी  दर्शन अथवा मुखदर्शन या कुठल्याच निमित्ताने मयुरेश्वर  मंदिराच्या परिसरात येऊ नये असे आवाहन  विश्वस्त पवार यांनी केले  आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article