अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाइन वक्तृत्वस्पर्धा संपन्न
बारामती- बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे मा. श्री अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त काटेवाडी शाळेत ऑनलाइन वक्तृत्वस्पर्धा पार पडली.
एन्व्हायरमेंटल फोरमचे अध्यक्षा मा. सौ. सुनेत्रा वहिनीसाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवत असलेल्या जि प प्राथमिक शाळा काटेवाडी या शाळेत लॉकडाऊन च्या काळात मुलांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी मा. श्री. अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऑनलाइन वकृत्व स्पर्धेचे आयोजन , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री धनंजय काळे, उपाध्यक्षा सौ.उमा काटे व मुख्याध्यापिका सौ. राणी ढमे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या ऑनलाइन वकृत्व स्पर्धेत शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेत प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना काटेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य मा. श्री. श्रीधर आनंदराव घुले यांच्या वतीने स्कूल बॅग, ट्रॉफी, मेडल्स व प्रशस्तीपत्रक असे बक्षीस वितरित करण्यात आले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे काटेवाडी गावचे सरपंच श्री माननीय श्री विद्याधर काटे यांनी स्वागत केले. या स्पर्धेचे परीक्षण श्री संदीप दळवी सर, श्री धनपाल माने सर व मुख्याध्यापिका सौ. ढमे मॅडम यांनी केले. तसेच काटेवाडी शाळेतील उपशिक्षिका वनिता सोडमिसे, नर्मदा शिंदे, गीतांजली देवकर, जयश्री चांगण, सोनाली तांदळे, लीना दळवी, उपशिक्षक संतोष सातपुते, बापू तांदळे. यांनी विद्यार्थ्यांना वकृत्व स्पर्धेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन केले.
स्पर्धेतील प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी
1) रुद्र सतीश दळवी 1ली
2) मृण्मयी बापू तांदळे 2री
3) उत्कर्षा अमोल समिंदर 3 री अ
4) अनुष्का धनंजय काळे 3री ब
5) सुप्रिया अशोक घुले 3 री क
6)अनुष्का आनंद भिसे 4थी अ
7) समीक्षा मालोजी झारगड 4थी ब
8) ज्ञानेश्वरी अर्जुन हरिहर 4थी क