बारामतीतील उद्याचा होणारा दहीहंडी उत्सव रद्द
Wednesday, August 12, 2020
Edit
बारामती - संपूर्ण महाराष्ट्रात करोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढतच आहे. बारामतीत देखील करोनाचे रुग्ण त्रिशतकाकडे वाटचाल करीत असल्यामुळे उद्या होणारा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला असून, बारामतीतील देखील दहीहंडी संघाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
बारामतीत लहान-मोठे मिळून ३५ मंडळे दहीहंडी उभारतात. गोकुळ अष्टमी दिवशी गोविंदांचा उत्साह वेगळाच असतो. पूर्ण बारामतीत दहीहंडी पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी होत असते. यंदा गर्दीच टाळायची असल्याने कोणीही दहीहंडीचे आयोजन करणार नसल्याचे पोलीस प्रशासन आणि दहीहंडी मंडळाच्या अध्यक्षांनी निर्णय घेतला आहे.