-->
अँड. रतनराव भगवानराव काकडे-देशमुख यांचे अल्पशा आजाराने निधन

अँड. रतनराव भगवानराव काकडे-देशमुख यांचे अल्पशा आजाराने निधन

बारामती तालुक्यातील निंबुत गावचे सुपुत्र सहकाराचे  अभ्यासु व्यक्तिमत्त्व तसेच कै.भगवानराव साहेबराव काकडे-देशमुख यांचे चिरंजीव बारामती पंचायत समितीचे मा. सदस्य अँड. रतनराव  काकडे-देशमुख यांचे रविवारी दि. २ रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, त्यांचे एल.एल.बी.चे शिक्षण पुण्यातील लाँकॉलेजला झाले ,  त्यांनी बारामती येथे वकीली केली ते सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ऑफिस  सुप्रीटेंड  व प्रोजेक्ट ऑफिससर होते, तसेच नीरा व्हॅली सहकारी डिस्टरली चे कार्यकारी संचालक होते , त्याचप्रमाणे बारामती तालुका पंचायत समितीचे सदस्य ही होते , त्यानंतर त्यांनी बारामती विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवली ते श्री बाबालाल काकडे निरा कॅनॉल खरेदी विक्री संघाचे संचालक ही झाले त्याचप्रमाणे भगवानराव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे त्यांनी चेअरमनपद ही भूषवले अशा अनेक मानाच्या पदावर त्यांनी काम केले होते,त्यांच्या जाण्याने नीरा , निंबुत सह सोमेश्वरनगर परिसरात खूप मोठे दुःखाचे डोंगर कोसळला असून  हळहळही व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी , विवाहित दोन मुले , एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.तसेच प्रगतशील बागायतदार ऋतुराज काकडे व भगवानराव विविध कार्यकारी सोसायटी खंडोबाचीवाडी चे अध्यक्ष ऋषिकेश काकडे यांचे ते वडील असच.



 


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article