-->
बारामती तालुक्यात जनतेनेच जनता कर्फ्यु पाळण्याची गरज

बारामती तालुक्यात जनतेनेच जनता कर्फ्यु पाळण्याची गरज

कोऱ्हाळे बु||- कोव्हीड 19 च्या वाढत्या प्रभावामुळे पुणे जिल्ह्यासह बारामती तालुक्यात मोठे संकट टाकल्याने आता जनतेनेच स्वतः पुढे येऊन जनता कर्फ्यु पाळण्याची गरज झाली आहे. राज्य शासन, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोना व्हायरस हद्दपार करण्यासाठी जीवाची पर्वा न करता आरोग्याच्या सेवा सुविधा पुरवण्यासह प्रत्येक नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग ठेवावे, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावे, गरज पडली तरच घराबाहेर पडावे, सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन करत असतानाही काही लोकं विनाकारण घराबाहेर पडत असून चौकाचौकात विनाकारण मास्क न वापरता राजरोस गर्दी करून कोरोना व्हायरसला आमंत्रण देत आहेत. बारामती तालुक्याचा आकडा बोलता बोलता 1200 च्या वर गेल्याने मोठी चिंता निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे बारामती शहरासह माळेगाव, पणदरे, कोऱ्हाळे, सोमेश्वरनगर, चोपडज, अंजनगाव येथील अनेकांचा मृत्यू झाला.



कोरोना व्हायरसापासून डॉक्टर, वकील, व्यापारी, पदाधिकारी सुटले नसल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे हे देखील कोरोना व्हायरसच्या उपाययोजना संदर्भात आढावा घेऊन जनतेने काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. एप्रिल महिन्यात पुणे व बारामतीत चार पाच पेशंट सापडल्याने चार महिने देशासह संपूर्ण राज्य लॉकडाऊन होते. यावर विरोधकांनी सत्ताधीकाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. आता पुणे शहरासह बारामतीचा आकडा उच्चांकी झाल्याने विरोधक गप्प का? कोरोना व्हायरस संदर्भात शासनाने कडक उपाययोजना राबविण्याची गरज असून आरोग्य विभागाला मनुष्य बळासह सर्वोतपरी मदत करावी, व ते चोख काम करतात का याकडे देखील सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जनतेने स्वतः पुढे येऊन जनता कर्फ्यु पाळावा.


 


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article