बारामती तालुक्यात आज 90 जण कोरोना बाधित, एकूण रुग्णसंख्या 1288
काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या rt-pcr 214 पैकी पॉझिटिव्ह- 50,निगेटिव- 73, प्रतीक्षेत-87 तसेच इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह -02 तसेच शासकीय एंटीजेन नमुने घेतलेले -37 पॉझिटिव्ह-13 निगेटिव्ह -24 तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले नमुने 71 पैकी पॉझिटिव्ह- 27 निगेटिव्ह 44 कालचे एकूण पॉझिटिव्ह आज सकाळपर्यंत-90. शहर -51 ग्रामीण- 39 एकूण बारामती रुग्णसंख्या- 1288. बारामती एकूण मृत्यू- 44. एकूण बरे झालेले रूग्ण- 556
बारामती तालुक्यातील काल झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये काटेवाडी येथील 70 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय पुरुष, पिंपळी येथील 14 वर्षीय मुलगी, तांदूळवाडी येथील 21 वर्षीय पुरुष, अंजनगाव येथील 80 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 26 वर्षीय महिला, 20 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 59 वर्षीय पुरुष, 68 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय पुरुष या रुग्णांचा समावेश आहे.
मळद येथे एक वर्षीय मुलगी, गुणवडी येथे 22 वर्षीय महिला, 10 वर्षीय मुलगा, सोमेश्वरनगर येथे 4 वर्षीय मुलगा, 29 वर्षीय महिला, करंजे येथे 4 वर्षीय मुलगा, मेखळी येथे 36 वर्षीय पुरुष, काऱ्हाटी येथे 60 वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर येथे 60 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी रोड येथे 32 वर्षीय महिला, बारामती शहरात 49 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, एक वर्षीय मुलगी, वडार कॉलनी येथे 29 वर्षीय पुरुष व घाडगे वस्ती येथे पन्नास वर्षे महिला व 31 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
शासकीय एंटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मुर्टी येथील 82 वर्षीय पुरुष, दशरथनगर येथील 48 वर्षीय महिला, 63 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, बारामती शहरातील 27 वर्षीय महिला, वंजारवाडी येथील 35 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, रुई येथील 52 वर्षीय पुरुष व 38 वर्षीय पुरुष, खाटीकगल्ली येथील 46 वर्षीय पुरुष, डोर्लेवाडी येथील 44 वर्षे पुरुष, माळेगाव कॉलनी येथील 55 वर्षीय महिला, उत्कर्षनगर येथील 32 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
बारामतीतील खाजगी रॅपिड अँटीजेन तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये महावीर पथ येथील 39 वर्षीय पुरुष, 73 वर्षीय महिला, 32 वर्षीय महिला, कसबा ढवाणगल्ली येथील 68 वर्षीय महिला, समीर हाइट्स सूर्यनगरी येथील 27 वर्षीय महिला, 48 वर्षे पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
मीरा मोहन रेसिडेन्सी अंबिकानगर येथील पन्नास वर्षीय पुरुष, महालक्ष्मी एलाईट जळोची रोड येथील 38 वर्षीय पुरुष व तीस वर्षीय महिला, शिवनंदन हॉस्पिटल येथील 65 वर्षीय महिला व 73 वर्षीय पुरुष, भिगवण चौक येथील 50 वर्षीय पुरुष, शारदानगर शिक्षक कॉलनी येथील 23 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे
सांगवी येथील 63 वर्षे पुरुष, चौधरवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 39 वर्षीय महिला, 15 वर्षीय युवक, 18 वर्षीय मुलगी, संतनगर पणदरे येथील 47 वर्षे पुरुष, कचरे वस्ती झगडेवाडी येथील 39 वर्षीय पुरुष, मेडद येथील 34 वर्षे पुरुष, कोकरे वस्ती सोनकसवाडी येथील 24 वर्षीय पुरुष व तीस वर्षीय पुरुष, देऊळगाव रसाळ येथील पन्नास वर्षीय पुरुष, पिंपळे गोसावी वस्ती येथील 49 वर्षीय पुरुष, लिमटेक येथील वीस वर्षीय पुरुष व मळद येथील 40 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यात तिघेजण कोरोनाबाधित
इंदापूर तालुक्यातील जाचक वस्ती येथील 55 वर्षीय पुरुष कळस येथील 55 वर्षे पुरुष व लासुर्णे येथील तीस वर्षे पुरुष रुग्ण बारामतीतील वेगवेगळ्या तपासण्यांमध्ये कोरोना बाधित आढळून आले आहेत.