१४ दिवसाच्या जनता कर्फ्युला विरोध - गणेश जाधव
बारामती - बारामती मधे १४ दिवसाच्या जनता कर्फ्युला विरोध करण्यात येत आहे. जनता जनता कर्फ्यु 7 दिवसाचा असायला हवा अशी मागणी माढा लोकसभेचे उमेदवार गणेश जाधव यांनी केली आहे.
बारामती व्यापारी संघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनीदेखील व्यापाऱ्यांना विश्वासात न घेऊन कर्फ्यु लावला असल्याचा आरोप केला आहे. कर्फ्यु लावायचा होता तर सर्वांनाच लावायचा कंपन्या कशाला चालू ठेवल्या असा घणाघात त्यांनी केला आहे.
बारामतीमध्ये आतापर्यंत 1198 रुग्ण सापडले असून मागील 5 दिवसात 5 महिन्याएवढे रुग्ण सापडले आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागात देखील कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.
कोरोनाची स्थिती नियंत्रणात यावी यासाठी जनता कर्फ्युची गरज आहे पण एवढया दिवस बंद असल्यामुळे अर्थव्यवस्था बिघडत आहे. कोरोना आजार रोखण्यासाठी खाटांची संख्या वाढवणे, टेस्टिंग वाढवणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे यासारख्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत स्वतंत्र व्यवसायी वकील गणेश जाधव यांनी व्यक्त केले. गणेश जाधव हे याअगोदर सुप्रीम कोर्टात सर्विसला होते. त्यांनी आता बारामती विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. ते स्वराज्य काँग्रेस संघटनेतून महाराष्ट्रात काम करतात.