
कोऱ्हाळे 3, लाटे 2, पणदरे 1 : तालुक्यात काल 61 जण पॉझिटिव्ह
Saturday, November 28, 2020
Edit
बारामती :बारामतीत काल दिवसभरात कोरोनाचे 61 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील 28 रुग्ण तर ग्रामीण भागातील 33रुग्ण आहेत.
कालचे शासकीय एकूण rt-pcr नमुने 288 घेण्यात आले होते. यापैकी एकूण 18 रुग्ण पॉझिटिव्ह आलेअसून, प्रतीक्षेत 16 आहेत तर इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण 03 आले आहेत.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 32 नमुन्यांपैकी 18पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच कालचे एकूण एंटीजन 143 नमुन्यांपैकी एकूण 25 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 18+18+25=61 झाली आहे. आतापर्यंत बारामतीची एकूण रूग्णसंख्या 4898 झाले असून एकूण बरे झालेले रुग्ण 4441 आहेत तसेच आतापर्यंत एकूण 127 मृत्यू झाले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.