दूध उत्पादक संघाकडून लिटरला 35 पैसे फरक
Wednesday, November 11, 2020
Edit
बारामती - बारामती तालुका सहकारी दुध उत्पादक संघाकडून दीपावली निमित्ताने दूध उत्पादक सभासदांना लिटरला 35 पैसे फरक दिला असल्याचे संघाचे अध्यक्ष संदीप पाटील जगताप यांनी सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मार्गदर्शनाखाली दूध उत्पादक संघाचे अतिशय पारदर्शक कामकाज चालते. सन 2019 20 सालातील वार्षिक मिटिंग covid-19 संसर्गामुळे होऊ शकली नाही तरी देखील संचालक मंडळाने धाडसी निर्णय घेऊन दूध उत्पादकांना काहीतरी देणे लागते म्हणून दीपावली सणाला आधार देण्यासाठी लिटरला 35 पैसे फरक देण्याचा निर्णय घेऊन प्राथमीक संस्थेकडे वर्ग केला आहे. तर दूध संस्थांना देखील 12 % बोनस दिला आहे. दूध संस्थांनी सभासदांना कोणतीही कपात न करता परत देण्याचे आवाहन जगताप यांनी केले आहे.
फरक व बोनस दूध उत्पादकांना मिळावा
बारामती तालुक्यातील दूध संस्था 90% खाजगी मालकीच्या असल्यासारखे वागतात. बोटावर मोजण्याइतक्या संस्थांनी दूध उत्पादकांना फरक दिला आहे. 90% संस्थांनी फरक व बोनस स्वतःच्या घशात घातला आहे. वाढती महागाई व covid-19 मुळे दूध उत्पादक पुरता उध्वस्त झाला आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दूध संघ, संस्था व सभासदांची समन्वय समिती नेमावी. अन्यथा दूध उत्पादकांचा फरक घशात घालणार्यांच्या विरोधात ग्राहक मंचात जाणार असल्याचे एका जाणकार दूध उत्पादकाने सांगितले.