
थोपटेवाडीत 45 दिवसांच्या विश्रांतीनंतर कोरोनाने डोके काढले वर, 2 दिवसात 2 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 7
Tuesday, November 24, 2020
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावात तब्बल दिड महिन्याच्या विश्रांतीनंतर कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने अनेकांची डोकेदुखी वाढली आहे. गावात शेवटचा रुग्ण हा 3 ऑक्टोबर रोजी सापडला होता.
परवा गावातील 38 वर्षीय व्यक्तीने मंगल लॅबला चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर काल 40 वर्षीय पुरुषाने चाचणी केली त्यात त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
गावात याअगोदर 5 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती, त्यातील 5 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेले आहेत.
परवा सापडलेली व्यक्ती व काल सापडलेली व्यक्ती असे मिळून गावात 2 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.