
मोढवे : लग्नसमारंभात डीजे वाजवणे पडले महागात, नवरदेव व डीजे मालकावर गुन्हा दाखल, 4.50 लाखांचे साहित्य जप्त
Saturday, November 28, 2020
Edit
कोऱ्हाळे बु : बारामती तालुक्यातील मोडवे गावात लग्नसमारंभासाठी डी.जे लावल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी नवरदेवास एकावर गुन्हा दाखल केला आहे. सागर गायकवाड रा. (राजपुर वस्ती) मोडवे, व रणजित देवकुळे (रा. धनकवडी, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर गायकवाड यांनी आपल्या लग्न समारंभ कार्यक्रमात रंजीत देवकुळे यांच्या मालकीची साऊंड सिस्टिम व लाईट लावून मोठ्या आवाजात गाणी वाजवून अंदाजे 50 ते 60 हुन अधिक पुरुष व स्त्रिया कोणतेही सामाजिक अंतर न राखता एकत्रित येऊन कार्यक्रम साजरा करीत असताना व इतरांचे मानवी जीवितास धोकादायक असलेल्या रोगांचा संसर्ग पसरण्याचा संभव असलेली हायगयीची व घातकी कृती करीत असताना व महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आदेशाची रीतसर पायमल्ली करीत असताना आढळून आल्याने वडगाव निंबाळकर पोलिसांनी भा द वि कलम 188 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51(ब), महाराष्ट्र covid-19 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करून अंदाजे 4,50,000 किमतीचे 4 साऊंड बेस, एक साऊंड टॉप तसेच साऊंड डी.जे मिक्सर,दोन पॉवर ऍम्प्लिफायर व इतर लाईट साहित्य जप्त केले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार वारुळे करीत आहेत.