-->
बारामती, राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीने होमगार्डच्या पायावर घातली चारचाकी

बारामती, राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीने होमगार्डच्या पायावर घातली चारचाकी

बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात मास्क व वाहन तपासणी दरम्यान झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीने होमगार्डच्या पायावरून गाडी घालण्याचा प्रकार घडला आहे. शहरातील पेन्सील चौकात गुरूवारी (दि. ५) दुपारी बाराच्या दरम्यान हा प्रकार घडला. तसेच नगरसेविकेच्या पतीने धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. यावेळी झालेल्या बाचाबाचीमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील नगरसेविकेच्या पतीची धुलाई केली.


        याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात नगरसेविकेच्या पतीवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


        बारामती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी होमगार्ड हे बारामती एमआयडीसी येथील पेन्सिल चौकात बेशिस्त वाहनांवर कारवाई करत असताना नगरसेविका पतीसह चार चाकी वाहनातून येत होत्या. चारचाकी वाहन होमगार्डच्या पायावरुन गेले. यावेळी पोलिसांनी त्या नगरसेविकेच्या पतीला गाडी थांबविण्यासाठी विनंती केली. मात्र, तरी देखील गाडी थांबवली गेली नाही. यावेळी पोलिसांनी धावत जाऊन गाडी रोखली व चौधर याला गाडीच्या बाहेर उतरण्यास सांगितले. मात्र, तो गाडीच्या बाहेर उतरायला तयार नव्हता. यावेळी पोलीस अधिकारी तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या गाडीची चावी काढून घेतली. यावेळी नगरसेविकेच्या पतीने पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली गेली. त्यानंतर पोलिसांनी देखील वर्दीचा हिसका दाखविला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article