-->
सोमेश्वर, सभासदांनी नियंत्रण ठेवले नाही तर FRP पेक्षा जास्त भाव मिळणार नाही - सतीश काकडे

सोमेश्वर, सभासदांनी नियंत्रण ठेवले नाही तर FRP पेक्षा जास्त भाव मिळणार नाही - सतीश काकडे

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम सन २०१ ९ -२० चा अंतिम उस दर ३००० / - रू . प्रति मे.टन व कामगारांनाही उच्चांकी बोनस १५ टक्के जाहिर करून सभासदांना व कामगारांना दिवाळी भेट दिली व खऱ्या अर्थाने न्याय देवुन पुणे जिल्ह्यात उच्चांकी अंतिम उस दर जाहिर केल्या बद्दल प्रथमतः चेअरमन , संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांचे सभासद , कामगार व कृती समितीच्या वतीने जाहिर अभिनंदन ! वास्तविक श्री सोमेश्वर कारखान्यावर कोणतेही कर्ज नाही कारखाना कर्ज मुक्त झाला आहे असे वेळोवेळी सांगुन चेअरमन यांनी स्वतःची पाठ सुध्दा थोपटुन घेतली व त्याची फ्लेक्सबाजी करून कारखान्याच्या पैशातुन सभासदांना जेवणावळी देखील घातल्या होत्या . आपल्या कारखान्याने मागील ३ वर्षापासुन गाळप , रिकव्हरी , साखर पोती , उपपदार्थ व को - जन यांचे उच्चांकी उत्पन्न घेतलेले आहे . त्यामुळे सोमेश्वर कारखाना इतर कारखान्यांच्या तुलनेत अंतिम उस दरात कोठेही कमी पडणार नाही एक नंबरचा उस दर देणार असे वेळोवेळी वर्तमान पत्रामधुन व सभांमधुन चेअरमन बढाय्या मारत होते . तसेच सहा महिन्यांपुर्वी माळेगाव कारखाना निवडणुकीच्या सभेत देखील गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी सोमेश्वर जादा भाव देईल असे मनोगत व्यक्त केले होते . व त्याचेच फळ म्हणुन आज खऱ्या अर्थाने सभासदांना ३००० / -रू . प्रति मे.टन अंतिम भाव जाहिर करून व कामगारांना १५ टक्के बोनस जाहिर केले ! कोरोनामुळे वार्षिक सभा होणार नसल्यामुळे चेअरमन यांना कोण विचारणार ? चेअरमन यांनी जो उच्चांकी भाव व कामगारांना उच्चांकी बोनस जाहिर केल्याने सभासदांची व कामगारांची दिवाळी गोड करून कल्याणच केले असल्याने सन २०१ ९ -२० चा अंतिम भाव व बोनस सभासद व कामगार कदापीही विसणार नाहीत अशी अपेक्षा । वास्तविक शेतकरी कृती समितीने मागील आठवड्यात ३५०० / - रू . प्रति मे.टन अतिम उस दर जाहिर करावा अशी मागणी केली ती योग्यच होती . कारण सन २०१८-१९ या वर्षाच्या साखर विकी दरापेक्षा सन २०१ ९ -२० यावर्षाची साखर विकी चढ्या भावाने केलेली आहे , उपपदार्थाचे उत्पादन देखील मागील वर्षा पेक्षा जादा झालेले आहे व विकी ही जादा झाली आहे . तसेच विज विकी सुध्दा चांगली झालेली आहे . तसेच कारखान्याने सभासदांच्या उस बिलातुन उस दर देण्यासाठी किंमत चढउतार निधी २० कोटी रूपये कपात केलेले आहेत . ( की जे कायद्याने फक्त उस दर देण्यासाठीच वापरावे लागतात ) त्यामुळे कारखान्याच्या संचालक मंडळाने किमान ३५०० / रू . प्रती मे.टन अंतिम उस दर जाहिर करण्यास काहीच अडचण नव्हती याबाबत कृती समिती आजही ठाम आहे . परंतु चेअरमन यांनी उच्चांकी ३००० / - रू . प्रती मे.टन उस दर व कामगारांना १५ टक्के बोनस जाहिर करून सभासदांची व कामगारांची दिवाळी गोड केल्याने आत्ता आम्हाला वाटत आहे की आमचाच कारखान्या बाबतचा अभ्यास कमी पडत आहे का आम्हीच कुठे तरी चुकत आहे ! अनेक सभासद मला व्यक्तीश : भेटुन व फोन करून सांगतात की गेल्यावर्षी ३३०० / - रू . प्रती मे.टन भाव मिळाला होता . यावर्षी सर्वच गोष्टीमध्ये सोमेश्वर पुढे असल्यामुळे ३३०० / - रू . प्रती मे.टना पेक्षा निश्चित जादा भाव मिळेल अशी अपेक्षा असताना कारखान्याने मात्र ३००० / - रू . प्रती मे.टन भाव कसा दिला ? कारण ज्या अर्थी चेअरमन यांनी ३००० / - रू . प्रती मे.टन अतिम भाव जाहिर केला त्यावरून चेअरमन यांचा ३५ वर्षांचा प्रदिर्घ अनुभव असल्याने व सलग ७ वर्ष चेअरमन असल्याने त्यांनी कारखान्यामध्ये कामगार कॉलणी , कॉलेज इमारत बांधकाम , वॉल कम्पाउंड , गोडावुन , अनेक ठिकाणी अंतर्गत PCC , अंतर्गत रस्ते अशी अनावश्यक करोडो रूपयांची कामे कारखान्यामध्ये चालु आहेत . या प्रकारे चेअरमन यांनी अनेक कामांचा धडाका लावल्यामुळे पुढील ३ पंचावार्षिकच्या संचालक मंडळाला करायला कोणतेही कामच ठेवले नाही . वरील सुरू असलेल्या सर्व कामांचे टेंडर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असले तरी वीट , वालु , डबर , खडी , कशसॅन्ड , स्टील , सिमेंट या सर्व वस्तु चेअरमन यांच्या खडी काशर व दुकानांतुनच घेतल्या जातात अशी खात्रीशीर माहिती मिळते . तसेच सभासदांना उस दर देण्यासाठी किमत चढउतार निधी २० कोटी रूपये कपात केलेले आहेत ते देखील चेअरमन यांनी वरील कामांसाठीच खर्च केलेला आहे असे दिसते . तसेच चालु वर्षी जाणीव पुर्वक जो अंतिम भाव कमी दिला त्याचे कारण २ कारखान्याकडे कोणत्याही प्रकारचा स्व निधीही शिल्लक ठेवला नाही . गेल्या ५ ते ७ वर्षात चेअरमन यांनी कामांचा सपाटा लावल्याने कारखान्यावर सुमारे १३३ कोटी रूपयांचे कर्ज केले आहे . चेअरमन व संचालक मंडळ गेली ६ वर्षात हळुहळु भांडवली कामे ( कारखान्यात आवश्यकता नसताना केली कामे ) केलेली आहेत त्याचा तपशिल .. अ.नं. आर्थिक वर्ष केलेली कामे खर्च रक्कम केलेल्या कामांचा तपशिल १ २०१३-१४ ३ कोटी ४ लाख रूपये साखर यंत्र सामुग्नी , बांधकाम , वाहने , संगणक २०१४-१५ १ कोटी ३५ लाख रूपये यंत्र सामुग्री , बांधकाम , स्प्रे पॉन्ड , बैलगाडया ३ २०१५-१६ १ कोटी ७५ लाख रूपये यंत्र सामुग्नी , बांधकामे , फर्नीचर २०१६-१७ ७ कोटी ३ लाख रूपये यंत्र सामुग्री , बांधकामे , इन्स्टॉलेशन , वाहने , बैलगाडया , मशनरी ५ २०१७-१८ ७ कोटी ४५ लाख रूपये यंत्र सामुग्री , बांधकामे , इन्स्टॉलेशन , ६ २०१८-१९ ६ कोटी ७० लाख रूपये यंत्र सामुग्री , साखर गोडावुन बांधकाम , बैलगाडया , वाहने , फर्नीचर , इन्स्टॉलेशन २०१ ९ -२० १४ कोटी रूपये मोलसिस स्टील टॅन्क -३.५० कोटी , स्प्रे पॉन्ड - ५.५० कोटी , इथेनॉल टॅन्क -१.५० कोटी , बांधकाम / मशिनरी - ३.५० कोटी ४ एकुण १४ कोटी रूपये २०२०-२१ २० कोटी रूपये पॅन बॉडी ८ कोटी रू , केन कॅरीयर काम - १ कोटी व किकर चॉपर ९ ० लाख इतर कामे ७ कोटी एकुण २० कोटी कारखाना गाळप क्षमता विस्तारवाढ - ७० कोटी ४० लाख , डिस्टीलरी विस्तारवाढ - ७२ कोटी २५ लाख ९ प्रस्तावित कामे १४२ कोटी ६५ लाख रू . एकुण २०३ कोटी ९ ७ लाख रू . तसेच गेले ५ ते ७ वर्षात चेअरमन यांनी आत्ता पर्यंत सुमारे ६१ कोटी ३२ लाख रूपयांची भांडवली गुंतवणुकीची कामे केलेली आहेत यासाठी साखर आयुक्त कार्यालयाची परवानगी घेतली किंवा नाही हा संशोधनाचा विषय आहे . व आत्ता प्रस्तावित विस्तावाढीची सुमारे १४२ कोटी ६५ लाख रूपयांची कामे कारखाना करणार आहे तसेच आजपर्यंतचे १३३ कोटी रूपयांचे कर्ज कारखान्यावर आहे ( साखर माल तारण कर्ज सोडुन ) असे अंदाजे एकुण २७५ कोटी रूपयांचे कर्ज कारखान्यावर होणार असुन व त्यावरील घसारा व व्याज़ या पोटी प्रती मे.टन ४०० / - रू . सभासदांच्या उस बीलातुन जाणार आहेत . म्हणजेच सभासदांना किमान ५ ते ६ वर्ष उसदर प्रती मे.टन ४०० / - रू . कमी मिळणार आहेत . म्हणजेच मागील दिवस पुढे येणार आहेत याची सभासदांनी दखल घ्यावी . तसेच चेअरमन हे काही संचालकांना व त्यांच्या जवळच्या सभासदांना व्यक्तीशः , काही कामगारांच्या नावे व काही त्रयस्थ व्यक्तीच्या नावे लाखो रूपये अॅडव्हान्स गेली ७ वर्ष दिले जात आहेत अशी सुध्दा खात्रीशिर माहिती मिळत आहे . तसेच ही रक्कम दरवर्षी नवेजुने करून बिनव्याजी दिली जाते . वरील सर्व बार्बीवर सभासदांनी वेळीच नियंत्रण आणले नाही तर आत्ताही व भविष्यातही FRP पेक्षा जादा भाव मिळणार नाही याची सभासद व संचालक मंडळाने नोंद घ्यावी . तसेच श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये चाललेल्या गैरप्रकाराबाबत आम्ही लवकरच सविस्तर खुलासा जाहिर करणार आहे . कारण सात हजार सभासदांनी पैसे न घेता माझ्यावर व कृती समितीवर विश्वास ठेवुन जे मतदान केले त्यांच्यासाठी शेतकरी , सभासद व कामगार यांना जागरूक करण्याचे काम मी व कृती समिती करीत आलेलो आहे व भविष्यात देखील करीत राहणार आहे अशी हमी देतो . तसेच कारखान्याचे चेअरमन यांनी कारखान्याच्या विस्तारवाढी बाबत साखर आयुक्त कार्यालयात प्रस्ताव दाखल केला असुन लवकरच साखर आयुक्त कार्यालयातुन त्यास मान्यता मिळेल असे प्रशासनाकडुन सांगितले जाते याबाबत चेअरमन यांना आवाहन करण्यात येते की किमान आत्ता तरी विस्तारवाढीची मान्यता मिळो अथवा न मिळो निर्णय घेण्यापुर्वी कारखान्याचे जेष्ठ व अभ्यासु सभासद , संचालक मंडळ , VSI चे अधिकारी तसेच कृती समिती


 

यांच्या बरोबर विस्तारवाढी व इतर बाबी संबंधी तात्काळ मिटींग घेवुन चर्चा करावी व नंतरच विस्तारवाढी संबंधीचा अंतिम निर्णय घ्यावा . याबाबतची सर्व माहिती मी मा.अजितदादा पवार यांना देखील तशा प्रकारचे पत्र देवुन विनंती केली आहे . कारण साखर आयुक्त कार्यालयात विस्तारीकरणा बाबतचा जो प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे तो पुर्णपणे चुकीचा व दिशाभुल करून तयार करण्यात आलेला आहे हे मी जबाबदारीने बोलत आहे व याबाबत मी योग्य वेळी लवकरच वेगळा खुलासा करणार आहे . तसेच चेअरमन व संचालक मंडळाचा दोन ते तीनच महिने कार्यकाळ राहिला असल्याने चेअरमन विस्तारवाढी बाबत घाई का करत आहेत ? का त्यांना त्यांचा कार्यकाळ संपण्या आगोदर विस्तारवाढीच्या काही ऑर्डर द्यायच्या आहेत का ? लवकर ऑर्डर देवुन कुणाच हित साधणार आहात ? की ज्याचा चालु गळीत हंगामात कोणताही फायदा होणार नाही . तरी चेअरमन यांनी आत्ताची सभासदांची व कामगारांची दिवाळी गोड केलेलीच आहे . परंतु मी व माझी कृती समिती सभासदांना फक्त दिवाळीच्या शुभेच्छा देवु शकतो ! तसेच चेअरमन यांनी शिल्लक राहिलेल्या तीन महिन्यांच्या कार्यकाळात किमान आत्ता तरी कारखाना , सभासद व कामगार भविष्यात अडचणीत येणार नाही असे कारखान्याच्या हिताचे कांतिकारक निर्णय घेण्याची सदबुध्दी चेअरमन यांना मिळो हीच सोमेश्वर चरणी प्रार्थना ! जय महाराष्ट्र - जय सहकार कळावे , आपला श्री सतिश शिवाजीराव काकडे विद्यमान संचालक मंडळातील काही संचालकांची आर्थिक परिस्थिती अचानक सुधारली आहे . त्याचा पर्दाफाश कृती समितीच्या वतीने लवकरच करण्यात येणार आहे . तसेच विस्तारवादी संदर्भात कृती समितीची जाहिर खुली चर्चा करण्याची तयारी आहे . ती तयारी संचालक मंडळाची आहे का ? सभासद उपाशी चेअरमन संचालक काजुशी ! कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळाने कोरोना महामारीच्या काळात सभादांच्या घामाच्या पैशातुन लाखो रूपयांचे ड्रायफुट्स ( काजु , बदाम , पिस्ता , अंजिर , खारीक , मनुके , आकोड , केशर इत्यादी ) फस्त केलेले आहेत , ( याचा पुरवा माझ्याकडे आहे ) असे जर घडत असेल तर सभासदांना कसा भाव मिळेल याचा सभासदांनी विचार करावा .. काल साखर आयुक्त कार्यालयाकडुन माहिती मिळाल्यावर असे समजते की , चेअरमन यांनी स्वतःच दि . ३१/७/२०२० रोजीच गाळप हंगाम २०१ ९ -२० चा अंतिम उस दर ३००० / - रू . प्रती मे.टन संचालक मंडळ व सभासदांना अंधारात ठेवुन फाईनल केला होता व त्याप्रमाणे विस्तारवाढीचा प्रस्ताव आर्थिक पत्रकांसह साखर आयुक्त कार्यालयात सादर केला होता . तसेच जाणीव पुर्वक बॉयलर प्रतिपादन व मोळीपुजन कार्यक्रमात अंतिम उस दर ३००० / - रू . फाईनल केलेला असताना देखील तो संचालक मंडळास व सभासदांना सांगितले नाही हे मी पुराव्यासह बोलत आहे ."

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article