बारामती, तृतीयपंथीयाच्या प्रेमात पडला अन जीव गमवून बसला
Friday, November 6, 2020
Edit
कोऱ्हाळे बु - असं म्हणतात की प्रेमाला जात, धर्म, लिंग, असे कोणतेच बंधन नसते. मात्र त्याच प्रेमाने बारामती तालुक्यातील एका तरुण युवकाचा बळी घेतला आहे. एका तृतीय पंथियाशी केलेला प्रेम विवाह त्या युवकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. या घटनेत युवकाने स्वतःला पेटवून घेतले असून त्याचा मृत्यू झाला आहे.
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक गावातील ही घटना आहे. घटनेतील विशाल ( नाव बदलले आहे ) गावातील एका गरीब घरातील मुलगा. वडील त्याच्या आई व कुटुंबाला सांभाळत नसल्याने तो आपल्या कुटुंबासह आजोळी राहत होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या आईने ही अशाच एका विवाहबाह्य संबंधात स्वतःला पेटवून घेतले होते व त्यात तिचा मृत्यू झाला होता. विशाल सोबत त्याच्या दोन्ही बहिणी राहत होत्या. मात्र नवऱ्याशी पटत नसल्याच्या कारणावरून त्या ही माहेरीच राहत होत्या. विशाल पडेल ते काम करून उदरनिर्वाह करत होता. तो अविवाहित होता.
मात्र गावात एका कार्यक्रमानिमित्त काही तृतीयपंथी आले होते. त्यामध्ये खुशबू ( नाव बदलले आहे ) हा तृतीयपंथी आला होता. कार्यक्रमात विशाल व त्याची ओळख झाली. दरम्यान ते भेटू लागले. तृतीयपंथी ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त जाऊ लागला त्या ठिकाणी ते भेटू लागले. त्यांचा ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. घरी मोठे कुणीच नसल्याने विरोध होण्याचा प्रश्नच नव्हता. समाज काय म्हणेल हे पाहता ते दोघे एकत्र राहू लागले होते अगदी जोडप्या प्रमाणे. तृतीयपंथी ही चांगले कार्यक्रम करत असल्याने चांगले पैसे मिळू लागले होते. मात्र इथूनच त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. विशाल दारूच्या आहारी गेला होता. त्या दोघात आता चांगलेच खटके उडू लागले होते. सारखे वाद होवू लागले होते. बहिणींचा व त्याचा ही संबंध आता संपला होता.
आता तो पूर्ण एकाकी पडला होता. त्याला आता बाहेर पडायचे होते मात्र त्याची सुटका होत नव्हती. दरम्यान विशाल ने तृतीयपंथी पत्नीचे तीन लाख रुपये चोरी केल्याचा आरोप त्याच्यावर झाला. त्यामुळे त्या दोघात वाद झाला. विशालने दीड लाख रुपये चोरल्याचे कबुल ही केले मात्र त्याची पत्नी तीन लाख रुपये चोरल्याचा आरोप करत होती. सततच्या वादामुळे विशाल ने दोन महिन्यांपूर्वी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकत पेटवून घेतले. यामध्ये त्याच्या तृतीयपंथी पत्नीच्या हाताला ही थोडे भाजले होते मात्र विशाल यात जवळपास ४० % जळाला होता. सुरुवातीला त्याला पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र तिथं त्याची प्रकृती सुधारत नसल्याने त्याला परत माघारी आणले. दोन दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ऐन पंचविशीत तृतीयपंथीयाच्या प्रेमात एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे एका तृतीपंथीयाचे प्रेम त्याला चांगलेच महागात पडले असून ते प्रेम थेट त्याला मृत्यूच्या दारात घेवून गेले आहे.