हरवलेले १ लाख ४० हजार अवघ्या एक तासात पोलिसांनी दिले शोधून
Thursday, November 12, 2020
Edit
सोमेश्वरनगर ता बारामती येथे गडदरवाडी येथील शेतकऱ्यांचे बँकेतून काढलेले १ लाख ४० हजार रुपये वडगाव निंबाळकर पोलिसांनी अवघ्या एक तासात शोधून दिल्याने परिसरातून पोलिसांचे कौतुक होत आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी गडदरवाडी येथील शेतकरी अनिल नानासो लकडे हे दिवाळीसाठी पुणे जिल्हा बँक सोमेश्वरनगर या शाखेतून मुलाला गाडी घेण्यासाठी १ लाख ४० हजार रुपये काढले. ते बँकेतून बाहेर पडले व घरी गेले पण बॅगेत पैसे दिसले नाही त्यांनी खूप शोधा शोध केली, पण रकम मिळाली नाही नंतर ते करंजेपूल पोलीस चौकी तक्रार देणेस आले.
करंजेपूल पोलीस चौकी अंमलदार पोलीस हवालदार दीपक वारुळे, पोलीस नाईक नितीन बोराडे, पोलीस कॉन्स्टेबल महादेव साळुंखे, पोलीस होमगार्ड वैभव तावरे, दत्तात्रय तावरे, स्वप्नील काकडे यांनी सहा. पोलीस निरीक्षण सोमनाथ लांडे यांचे मार्गदर्शन खाली सोमेश्वरनगर ते गडदरवाडी गावापर्यंतचे सर्व cctv केमेरा ची तापसनी केली. यामद्धे पोलिसांना एका केमेरात एक अनोळखी इसम सदरची रक्क्म सापडल्याचे दिसले. याबाबत अधिक तपास केला असता वाणेवाडी येथील वसंत आनंदराव भोसले हे असले बाबत समजले. त्यांना सदर पैशाबाबत विचारणा केली असता मला हे पैसे सापडले आहेत. पण तिथं कोणीच नसल्याने ते पैसे मी घरी घेऊन गेलो. ती रक्कम मी लगेच आणून देतो, असे म्हणून त्यांनी ती परत केली आहे सदर बाबत लकडे यांनी पोलीस अंमलदार यांचे खूप खूप आभार मानले. भोसले यांनी ही रक्कम प्रामाणिकपणे परत केल्याने त्यांचेही आभार मानले.